शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 10:21 IST2025-06-01T10:20:36+5:302025-06-01T10:21:53+5:30

मुंबईतील चेंबूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याने तिला जिवंत जाळले.

Husband got angry after being rejected for Physical relation, tried to burn his wife alive! Shocking incident in Mumbai | शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 

शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 

दिवसेंदिवस गुन्हेगारीची अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. आता मुंबईतीलचेंबूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या एका पतीने आपल्याच पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने हे भयानक पाऊल उचलले. या घटनेत, ३८ वर्षीय विवाहित महिला जबर जखमी झाली असून, तिची प्रकृती गंभीर आहे. सध्या पीडितेवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चेंबूरमधील वाशी नाका येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने चेंबूरमध्ये खळबळ उडाली असून, परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पत्नीने शरीर संबंधास दिलेला नकार
या प्रकरणाबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ३८ वर्षांची असून, ती तिच्या पतीसोबत चेंबूरमधील वाशीनाका येथे राहते. काल ती सकाळी उठली आणि कामावर जाण्यासाठी तयार होत होती. पण, याच दरम्यान तिच्या पतीने शरीरसुखाची मागणी केली. मात्र, महिलेने पत्नीने कामाला जायचे आहे, असे म्हणत शरीर संबंधास नकार दिला.

पत्नीचा नकार ऐकून पती संतापला आणि रागाच्या भरात त्याने घरातून रॉकेलचा कॅन उचलला आणि तो पत्नीवर ओतला. त्यानंतर त्याने तिला पेटवून दिले. आगीने पेट घेतल्यानंतर महिलेने ओरडायला सुरुवात केली.

पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी आणि रस्त्यावरून जाणारे लोक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचा प्रयत्न करून, तिला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. सायन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत महिला ७० टक्क्यांहून अधिक भाजली आहे. सध्या तिची प्रकृती देखील गंभीर आहे.

या प्रकरणात कारवाई करताना, चेंबूर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने चेंबूर परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Husband got angry after being rejected for Physical relation, tried to burn his wife alive! Shocking incident in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.