उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक पती आपल्या पत्नीला परत घरी नेण्यासाठी सासूचे पाय धरून गयावया करत होता. "माझ्या पत्नीला परत पाठवा," अशी विनवणी तो रडत-रडत सासूकडे करत होता, पण सासूने आपल्या रडणाऱ्या जावयाचं काहीही ऐकलं नाही आणि तिला बाजूला सारून ती तिथून निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी घडली. पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर मथुरा येथील रहिवासी संजय अलिगढच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला होता. तिथे पती-पत्नीमध्ये चर्चा झाली, पण आईने आपल्या मुलीला जावयासोबत पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. यावर हतबल झालेला संजय सासूचे पाय पकडून रडू लागला आणि "आई, माझ्यावर दया करा" असं म्हणू लागला. तो पोलिसांसमोर हात जोडून न्यायाची मागणी करत होता.
महिला पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर पोलीस लाईन परिसरात संजयने आधी पत्नीला समजावण्यासाठी हात जोडले. मात्र, जेव्हा काहीच उपयोग झाला नाही, तेव्हा तो पोलीस लाईनच्या गेटवर सासूच्या पाया पडला. "आई, दया करा... तुमच्या मुलीला समजवा आणि माझ्यासोबत पाठवा" असं तो वारंवार म्हणत होता. परंतु, पतीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
या घटनेबाबत बोलताना संजयने सांगितलं की, त्याचा विवाह गोंडा क्षेत्रातील पिंजरी गावातील एका तरुणीशी झाला आहे. तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला तीन मुलं असून मोठा मुलगा आठ वर्षांचा आणि दिव्यांग आहे. संजयचा आरोप आहे की, मुलाच्या उपचाराच्या नावाखाली त्याच्याकडून पैसे घेतले गेले, पण उपचार केले नाहीत. इतकेच नाही तर, पत्नीने माहेरच्या लोकांना बोलावून त्याला मारहाण केली आणि दागिने घेऊन पळून गेली, असाही आरोप त्याने केला आहे.
Web Summary : In Aligarh, a husband pleaded with his mother-in-law to send his wife back, even falling at her feet. The mother-in-law refused, ignoring his pleas. The distraught husband alleged his wife took money and jewelry before leaving.
Web Summary : अलीगढ़ में, एक पति अपनी सास के सामने पत्नी को वापस भेजने की गुहार लगाता रहा, यहाँ तक कि उसके पैरों पर गिर गया। सास ने उसकी दलीलें अनसुनी कर दीं। परेशान पति ने आरोप लगाया कि उसकी पत्नी पैसे और गहने लेकर भाग गई।