पती-पत्नीच्या वादात पतीची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 07:17 PM2021-06-20T19:17:00+5:302021-06-20T19:17:16+5:30

Suicide Case : घटना रविवारी सकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

Husband commits suicide by strangling fan in marital dispute | पती-पत्नीच्या वादात पतीची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या

पती-पत्नीच्या वादात पतीची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या

Next

घुग्घुस(चंद्रपूर) : काॅलरी परिसरातील शास्त्रीनगर येथील आशिष ओमरीक वर्मा यांनी आपले घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

वेकोलिच्या कामगार परिसरातील शास्त्रीनगर येथील आशिष ओमरीक शर्मा यांचा प्रेमविवाह सहा वर्षापूर्वी त्याच परिसरातील राजीव रतन चिकित्सालयात साफसफाई करणाऱ्या युवतीसोबत झाला होता. त्यांना चार वर्षाची मुलगी आहे. विवाहानंतर आशिष हा व्यसनाधीन होऊन पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन मारहाण करायचा. १६ जूनला असाच प्रकार घडला. मात्र हा प्रकार सहन न झाल्याने घुग्घुस पोलीस ठाणे गाठून पत्नीने पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर ती घरी न जाता आपल्या मैत्रिणीकडे राहत होती. रविवारी सकाळी आशिषने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेच्या संदर्भात पोलीस पुढील तपास करीत आहे.

Web Title: Husband commits suicide by strangling fan in marital dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app