शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पत्नीकडून घरगड्यासारखी वागणूक मिळत असल्याने पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 14:46 IST

दोघांचा ४ वर्षापूर्वी झाला होता़ प्रेमविवाह

ठळक मुद्देपत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता़. पण, मराठी संस्कृतीत ती सामावली गेली नाही़. नोकरीनिमित्त दोघे पुण्यात राहत असताना पत्नी स्वत:चे कपडे धुवायला लावून घरगड्यासारखे राबवत, नातेवाईक मुलीशी संबंध असल्याचा संशय घेऊन पत्नीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़.प्रणय मिलिंद खुटाळ (वय २९, रा़ जिनिया बिल्डिंग, मगरपट्टा सिटी, हडपसर) या तरुणाचा नाव आहे़. याप्रकरणी प्रणय याची आई संगिता मिलिंद खुटाळ (वय ४९, रा़ लिंबोदा, ता़ हतोद जि़ इंदौर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ ही घटना मगरपट्टा येथील जिनिया बिल्डिंगमध्ये ७ नोव्हेंबर २०१९ रोजी घडली़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रणय हा मुळचा इंदौर येथील राहणार असून त्याची पत्नी कनिका ही भोपाळची राहणारी आहे़. दोघांचा ४ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता़. त्यानंतर दोघेही पुण्यातील मगरपट्टा एका खासगी विमा कंपनीत कामाला होता़. तर, कनिका ही या परिसरातील एका आंतरराष्ट्रीय कंपनीतील मनुष्यबळ विकास विभागात कामाला होती़ मगरपट्टा येथील जिनियामध्ये फ्लॅट घेतला होता़. तेथे दोघेच राहायला होते़. दरम्यान, कनिका गर्भवती असल्याने सुमारे दीड वर्षापूर्वी तिने नोकरी सोडली़ तिला बाळही झाले़. संगिता खुटाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कनिका प्रणय याला स्वत:चे कपडे धुवायला सांगत असे़. त्याला घरातील कामे घरगड्यासारखे करायला सांगून मानहानी करीत असत़. तिच्या नावावर प्रॉपर्टी करण्यावरुन त्यांच्यात वाद होत असत़. बाळ लहान असल्याने कनिका सध्या घरीच होती़. त्याचा कामावरील तसेच नातेवाईक मुलीशी संबंध असल्याचा ती संशय घेत असत़. त्यावरुन त्याचा शारिरीक व मानसिक छळ करीत असत़. पत्नीच्या या छळाला कंटाळून प्रणय याने ७ नोव्हेंबर २०१९ रोजी घरातील बेडरुममध्ये पंख्यास बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़. त्याच्या मृत्युला त्याची पत्नी कारणीभूत असल्याचे संगिता खुटाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे़. त्यावरुन हडपसर पोलिसांनी कनिका खुटाळ यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे़. 

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नPoliceपोलिसDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी