खळबळजनक! पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला बाथरूममध्ये पुरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 16:42 IST2022-03-06T16:29:23+5:302022-03-06T16:42:05+5:30
Murder Case : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रनाथ रॉय याने गुरुवारी दारूच्या नशेत असताना काही स्थानिक लोकांना ही घटना सांगितली होती.

खळबळजनक! पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला बाथरूममध्ये पुरला
पश्चिम बंगालमधील धंताला येथे गुरुवारी एका महिलेचा मृतदेह तिच्याच घराच्या बाथरूममधून सापडला. महिलेच्या हत्येचा आरोप तिच्याच पतीवर लावण्यात आला आहे. पतीने तिचा मृतदेह बाथरूममध्ये पुरल्याचा आरोप आहे. बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलीस आरोपीच्या शोधात
४० वर्षीय रवींद्रनाथ रॉय असे आरोपी पतीचे नाव आहे. सध्या तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यासोबतच पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी कंबर कसली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रनाथ रॉय याने गुरुवारी दारूच्या नशेत असताना काही स्थानिक लोकांना ही घटना सांगितली होती. यानंतर ही बातमी संपूर्ण परिसरात आगीसारखी पसरली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह बाथरूममधून बाहेर काढला आणि त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या मुलाला बेड्या
शॉकिंग! बलात्काराचा केला सौदा, प्रकरण दाबण्यासाठी पंचायतीत ठरले पीडितेस ७० हजार देण्याचे
आरोपीची तिसरी पत्नी होती
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ फेब्रुवारीच्या रात्री घडली जेव्हा रवींद्रनाथ रॉय यांनी कथितरित्या आपल्या पत्नीचा घरातल्या जड वस्तूने वार करून खून केला. यानंतर त्यांनी मृतदेह बाथरूममध्ये पुरला. ती त्याची तिसरी पत्नी होती. बाथरूममधून महिलेचा मृतदेह सापडल्याच्या घटनेने संपूर्ण धंतालातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.