मोमोज खायला घालून बेशुद्ध केलं, तिघांनी अत्याचार करुन रस्त्यावर सोडलं; आरोपींमध्ये पतीचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:14 IST2025-09-15T13:43:51+5:302025-09-15T14:14:32+5:30
मध्य प्रदेशात पत्नीने पतीसह आणखी दोघांवर बलात्कार करुन रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

मोमोज खायला घालून बेशुद्ध केलं, तिघांनी अत्याचार करुन रस्त्यावर सोडलं; आरोपींमध्ये पतीचाही समावेश
Chhatarpur Gang-rape Case: मध्य प्रदेशात सामूहिक बलात्काराची हादरवणारी घटना समोर आली आहे. ९ सप्टेंबर रोजी सागर-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर एक महिला हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. महिलेने आरोप केला आहे की तिला नशेत असलेले मोमोज खायला देण्यात आले आणि नंतर तीन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी एक तिचा पती होता. या क्रूरतेनंतर तिला बांधून सागर-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर बेशुद्ध अवस्थेत फेकून दिले.
छतरपूर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. रेल्वे ओव्हरब्रिजजवळ हातपाय बांधलेल्या अवस्थेत महिलेला रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली. महिलेला तातडीने सागर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे ती शुद्धीवर आली आणि तिने तिच्या पती आणि इतर दोघांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला.
महिलेने पोलिसांना सांगितले की तिचा पती तिला बाजारात घेऊन गेला होते. तिथे त्याने मोमोज खायला दिले. ते खाल्ल्यानंतर लगेचच ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिघांनी बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला, तिला बांधून ठेवले आणि नंतर तिला रस्त्याच्या कडेला सोडून दिलं. जर कोणतीही कारवाई केली नाही तर मी आत्महत्या करेल आणि पोलिसांना जबाबदार धरेल असा इशाराही महिलेने दिला.
पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्कार, गुन्हेगारी कट रचणे आणि चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. २०१४ पासून महिलेने यापूर्वी दमोह, बदामलहरा, गुलगंज आणि बिजावर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि हल्ल्याच्या अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. आधीच्या एका प्रकरणात, तिने तिच्या गावातील सरपंच आणि सचिवांवर बलात्काराचा आरोप केला होता. तो नंतर तडजोडीने मिटवण्यात आला. त्यामुळे महिलेची वैद्यकीय चाचणी सुरु असून पोलीस पुरावे गोळा करत आहेत.