अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 20:27 IST2020-11-05T20:27:00+5:302020-11-05T20:27:37+5:30

Murder : याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकरी पतीला अटक केली आहे.

Husband brutally murders wife on suspicion of having an affair | अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

ठळक मुद्देरफिक खान (वय ४०) असे आरोपी पतीचे तर नसरीन रफिक खान (वय ३६) असे मयत पत्नीचे नाव आहे.

भिवंडी - पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरू पतीने पत्नीचा निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना भिवंडी शहरातील अंसार नगर परिसरात बुधवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकरी पतीला अटक केली आहे. रफिक खान (वय ४०) असे आरोपी पतीचे तर नसरीन रफिक खान (वय ३६) असे मयत पत्नीचे नाव आहे.
             

मिळालेल्या माहितीनुसार मागील १७ वर्षांपासून रफिक व  नसरीन यांचे लग्न झाले असून त्यांना तीन मूल आहेत . रफिक खान हा यंत्रमाग करखाण्यात काम करीत असून मागील दोन ते तीन वर्षांपासून पत्नी नसरीन हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय रफिक यास होता यावरून रफिक व नसरीन यांच्यात नेहमी भांडण होत असे. मात्र मागील तीन दिवसापूर्वी नसरीन आपल्या बहिणीकडे राहण्यास आली होती त्यामुळे रफिक आपल्या पत्नीला भेटण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचला मात्र अनैतिक संबंधाच्या कारणावरून रफिक व नसरीन यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली व या भांडणाचे रुपांतर नंतर जोरदार हाणामारीत झाले यांनतर रफिक याचा राग टोकाला जाऊन रफिकने धारदार चाकूने आपल्या पत्नीच्या पोटावर व हातावर सपासप वार केले . तब्बल दहा ते बारा वार केल्याने पत्नी नसरीन खान रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली व तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून आरोपी पती रफिक खान यास अटक केली आहे . या हत्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Husband brutally murders wife on suspicion of having an affair