पत्नीने होळीला चिकन बनवलं नाही म्हणून भडकला पती, आधी डोकं फोडलं मग् हात मोडला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 09:30 IST2023-03-09T09:29:50+5:302023-03-09T09:30:38+5:30
Crime News : चंद्रपूर शहरातील धुळवडीच्या दिवशीची ही घटना आहे. इथे राहणारा तरूण चिकन घेऊन आला होता. घरी तो पत्नीला म्हणाला की, चिकन बनवून दे.

पत्नीने होळीला चिकन बनवलं नाही म्हणून भडकला पती, आधी डोकं फोडलं मग् हात मोडला...
Crime News : पत्नीचं चिकन बनवण्यास नकार देणं पतीला इतकं खडकलं की, त्याने पत्नीचं डोकं फोडलं आणि हातही मोडला. डॉक्टरांनुसार, महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
चंद्रपूर शहरातील धुळवडीच्या दिवशीची ही घटना आहे. इथे राहणारा तरूण चिकन घेऊन आला होता. घरी तो पत्नीला म्हणाला की, चिकन बनवून दे. पण पत्नी म्हणाली की, स्वयंपाक आधीच तयार आहे. चिकन आता नाही बनवत, सायंकाळी बनवू.
पत्नीने चिकन बनवण्यास नकार दिल्याने पती चांगलाच संतापला. त्याला इतका राग आला की, अंगाणातील काठी आणून त्याने तिला बेदम मारहाण सुरू केली. संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यावर अनेक वार केले. ज्यात ती गंभीर जखमी झाली. पतीच्या मारण्याने पत्नीचा एक हातही मोडला.
आजूबाजूच्या लोकांनी या घटनेची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पतीला अटक केली. तेच महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसांनी सांगितलं की, घटनेवर पुढील कारवाई केली जात आहे.