शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

हल्लेखाेर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; गोळी झाडून घेतल्याने प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 08:33 IST

डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ राहणाऱ्या सोमनाथने ८ फेब्रुवारीला चारित्र्याच्या संशयातून पत्नी वंदनावर भररस्त्यात चाकूने वार केले होते.

डोंबिवली : पत्नीच्या चारित्र्यावर  संशय घेऊन भररस्त्यात तिच्यावर चाकूने वार करून पसार झालेला पती सोमनाथ देवकर (वय ४५) याने घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सकाळी दत्तनगर येथे घडली. यात सोमनाथ गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ राहणाऱ्या सोमनाथने ८ फेब्रुवारीला चारित्र्याच्या संशयातून पत्नी वंदनावर भररस्त्यात चाकूने वार केले होते. यात वंदना गंभीर जखमी झाली. तर त्याने घटनेनंतर पोबारा केला होता. रामनगर पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, रविवारी सकाळी १० च्या सुमारास घरी आला. त्याच्याजवळील पिस्तुलाने स्वत:च्या छातीवर गोळी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. हे समजताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले.

याआधीही हत्यार बाळगल्याचा गुन्हासोमनाथवर मारामारी आणि पिस्तूल बाळगल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.  पत्नीवर वार करून तो नाशिक येथील जंगलात लपला होता. त्यानंतर रविवारी तो सकाळी घरी कोणीही नसताना आला आणि त्याच्याजवळील बेकायदेशीर पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. हे पिस्तूल मध्यप्रदेश येथून आणले असल्याचे त्याने सांगितले. मात्र, ते कोणाकडून आणि कशासाठी आणले याचा तपास सुरू असल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली. सोमनाथ हा मासळी, भाजीविक्रीचा व्यवसाय करायचा तसेच खानावळीचीदेखील कामे करायचा, अशी माहितीही त्यांनी दिली.