शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

माथेफिरूने पत्नीसह पाच मुलांवर केले कुऱ्हाडीने वार, चौघांचा मृत्यू; पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला...

By बाळकृष्ण परब | Updated: December 1, 2020 14:54 IST

Crime News : या माथेफिरूने त्याच्या कुटुंबातील पत्नी आणि मुले,मुली अशा एकूण सहा जणांवर कुऱ्हाडीने वार करत हल्ला केला. या हल्ल्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि एक मुलगी गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देमाथेफिरू व्यक्तीने आपल्या पत्नीसह पाच मुलांवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील सिवान जिल्ह्यात घडलीया घटनेत गंभीर जखमी झालेल्या पत्नी आणि पाच मुलांपैकी, चार मुलांचा मृत्यू झाला आहेगंभीर जखमी असलेली आरोपीची पत्नी आणि एका मुलीवर उपचार सुरू आहेत

पाटणा - एका माथेफिरू व्यक्तीने आपल्या पत्नीसह पाच मुलांवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील सिवान जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पत्नी आणि पाच मुलांपैकी, चार मुलांचा मृत्यू झाला आहे. तर आरोपीची पत्नी आणि एका मुलीवर उपचार सुरू आहेत.सिवानमधील भगवानपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील बलहा गावातील रहिवासी असलेल्या या माथेफिरूने त्याच्या कुटुंबातील पत्नी आणि मुले,मुली अशा एकूण सहा जणांवर कुऱ्हाडीने वार करत हल्ला केला. या हल्ल्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि एक मुलगी गंभीर जखमी झाले. त्यांना सिवानमधील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांच्या गंभीर प्रकृतीचा विचार करून डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारांसाठी पाटणा येथे नेण्यास सांगितले.आरोपी व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात त्याची मुलगी ज्योती कुमारी, मुलगा अभिषेक कुमार, मुकेश कुमार आणि भोला कुमार यांचा मृत्यू झाला. तर मुलगी अंजली कुमारी आणि पत्नी रीता देवी यांच्या प्रकृती गंभीर आहे. या प्रकाराबाबत आरोपीने सांगितले की, आम्ही कुठेतरी बाहेर फिरून आलो होते. त्यावेळा माझ्या शरीरात कुणीतरी घुसले. त्याने मला कुऱ्हाड उचलून कुटुंबीयांना मारण्यास सांगितले. त्यानंतर मी कुऱ्हाड उचलली आणि वार केला.दरम्यान, आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. मनोरुग्णाप्रमाणे बोलणाऱ्या पतीने हेसुद्धा सांगितले की, ही घटना घडल्यानंतर मी सिवानचे डीएम आणि ठाण्याला फोन केला होता. मात्र कुणीही फोन उचलला नाही. अखेरीस पोलिसांच्या गस्तीपथकाने घरी येऊन मला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार