बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:45 IST2025-10-29T17:44:32+5:302025-10-29T17:45:04+5:30
Uttar Pradesh Crime News: बायकोचा गळा चिरल्यानंतर पतीच्या डोक्यात बनाव रचायचा प्लॅन आला, पण...

बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील बरेलीच्या नवाबगंजमध्ये ओम सिटी कॉलनीत एक धक्कादायक घडना घडली. मंगळवारी २१ वर्षीय अनिताचा गळा चिरून खून करण्यात आला होता. तिचा पती अनिल ट्रॅक्टर चालवत होता. संध्याकाळी ५:३० वाजता अनिल घरी आला तेव्हा दरवाजा बंद होता. त्याने अनिताला शोधले, पण ती सापडली नाही, अनिल दरवाजा तोडून खोलीत गेला, तर त्याला तिचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला. तिचा गळा चिरून खून करण्यात आला होता आणि जवळच रक्ताने माखलेला विळा पडला होता. (Husband Wife Crime)
मुलीकडच्यांनी पती आणि कुटुंबीयांवर दाखल केला खटला
माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक मुकेश चंद्र मिश्रा आणि फॉरेन्सिक टीम पोहोचली. घरात काही वस्तूही पसरलेल्या अवस्थेत होत्या. त्यामुळे घरात दरोडा पडल्याचा किंवा चोरीचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. पण महत्त्वाची बाब म्हणजे, चोरांनी काहीही चोरले नव्हते. पोलिसांनी जेव्हा अनिताच्या माहेरच्यांना कळवले तेव्हा, तिचा भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांनी तिचा पती, सासरे जमुना, सासू, मेहुणे सचिन आणि मामा महेश कुमार यांच्याविरुद्ध खटला दाखल केला.
हळूहळू गूढ उलगडले...
क्योल्डिया येथील कृष्णपाल यांनी सांगितले की, त्याने एक वर्षापूर्वी त्याची बहीण अनिताचे लग्न अनिलशी लावून दिले होते. लग्नात त्याने अंदाजे १४ लाख रुपये खर्च केले होते, परंतु सासरचे लोक समाधानी नव्हते. मृत महिला, तिचा पती अनिल आणि मेहुणे सचिन हे ओम सिटीमध्ये राहत होते. तिचे सासरचे लोक तिला चारचाकी कार खरेदी करण्यासाठी दबाव आणत होते. तिने त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनी तिला समजावले आणि परत पतीकडे पाठवले. पण मंगळवारी संध्याकाळी ५-६च्या सुमारास अनिलने तिच्या आईला फोन करून अनिता बेपत्ता असल्याचे सांगितले. ओम सिटी येथे पोहोचल्यानंतर त्यांना तिचा खून झाल्याचे कळले.
अंमली पदार्थ देऊन किंवा अनेक लोकांकडून हत्या
पोलिस तपासात असे दिसून आले की चोरीचा प्रकार भासवण्यासाठी वस्तू मुद्दामून विखुरल्या गेल्या होत्या, परंतु काहीही चोरीला गेले नव्हते. हत्येत वापरलेल्या विळ्यावर फक्त रक्त होते. घटनास्थळी संघर्षाचे कोणतेही चिन्ह आढळले नाही. अनिताला अंमली पदार्थ देऊन हत्या करण्यात आली असावी किंवा एकापेक्षा जास्त लोक यात सामील असावेत असा अंदाज लावला जात आहे. हत्येनंतर घटनास्थळी पसरलेले रक्त सुकले होते. यावरून असे सूचित झाले की ही हत्या सहा ते सात तास आधी झाली होती.
पतीच निघाला खूनी
लग्नाच्या अवघ्या एका वर्षातच पती अनिलने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून केल्याचे उघड झाले. त्याने हे प्रकरण दाबण्यासाठी दरोड्याचा बनाव केला आणि मृतदेह एका खोलीत लपवून ठेवला होता. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला, त्यावेळी सत्य समोर आले.