धक्कादायक! पतीने काळ्या रंगावरुन चिडवले, पत्नीने टोकाचे पाऊल उचलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 12:43 IST2022-09-28T12:31:32+5:302022-09-28T12:43:20+5:30

छत्तीसगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने पत्नीला काळ्या रंगावरुन चिडवले म्हणून पत्नीने पतीवर कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Husband angered his wife over black Wife killed her husband in Chhattisgarh | धक्कादायक! पतीने काळ्या रंगावरुन चिडवले, पत्नीने टोकाचे पाऊल उचलले

धक्कादायक! पतीने काळ्या रंगावरुन चिडवले, पत्नीने टोकाचे पाऊल उचलले

छत्तीसगड: छत्तीसगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने पत्नीला काळ्या रंगावरुन चिडवले म्हणून पत्नीने पतीवर कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या दाम्पत्याचे काही महिन्यापूर्वी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी पती पत्नीला तिच्या रंगावरुन चिडवत होता. पत्नीचे नाव संगीता सोनवानी असं आहे, तिचे लग्न ४० वर्षीय अनंत याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही दिवस ठिक होते. पण काही दिवसांनी पती पत्नीला रंगावरुन चिडवू लागला. यावरुन अनेकवेळा यांच्यात वाद झाल्याचे पत्नीने पोलिसांना सांगितले. 

कल्याणमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा

पुन्हा पतीने पत्नीला चिडवण्यास सुरुवात केली. रात्री अचानक या विषयावरुन त्यांच्यात वाद झाला, या वादात पत्नीने पतीवर कुऱ्हाडीचा वार केला, यात पतीचा मृत्यू झाला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे, महिलेने गुन्हा कबुल केला आहे. 

पतीचे झाले होते दुसरे लग्न

पती अनंतचे हे दुसरे लग्न आहे, त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याने दुसरे लग्न केले होते. पतीचे पहिल्या पत्नीसोबतही वाद होते अस सागंण्यात येत आहे. यानंतर अनंतने दुसरे लग्न केले. काही दिवस या पत्नीसोबत पटले. पण काही दिवसांनी या पत्नीसोबतही वाद सुरू झाले. 

प्राध्यापिकेला अडवून तो म्हणाला, "माझ्याशी बोल अन्यथा मी मरेन"; अमरावतीतील धक्कादायक घटना

पत्नीने पतीची हत्या केली तेव्हा पत्नी घटनास्थळी होती, पण पत्नीने पोलिसांना चुकीचे उत्तर दिली. पण पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व पुरावे हस्तगत केल्यानंतर पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

Web Title: Husband angered his wife over black Wife killed her husband in Chhattisgarh