मिठी मारली, चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, महिला कर्मचाऱ्याचं लैंगिक शोषण, कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 15:52 IST2022-09-18T15:51:15+5:302022-09-18T15:52:03+5:30
Crime News: कर्नाटक काँग्रेसमध्ली एका नेत्याला सलूनमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मिठी मारली, चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, महिला कर्मचाऱ्याचं लैंगिक शोषण, कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याला अटक
धारवाड - कर्नाटककाँग्रेसमध्ली एका नेत्याला सलूनमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ब्युटीशियनचं काम करणाऱ्या या महिलेने तक्रारीमध्ये आरोप केला की, आरोपी मनोज करजागी शनिवारी सलूनमध्ये आला. त्याने जबरदस्तीने मिठी मारण्याचा आणि चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. महिलेने तिच्या प्रियकराला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तिच्या प्रियकराने दोन मित्रांसोबत सलूनमध्ये धाव घेत या काँग्रेस नेत्याची धुलाई केली.
या प्रकरणी समोर येत असलेल्या माहितीनुसार आरोपीला महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. तसेच कोर्टाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. महिलेचे लैंगिक शोषण करण्यासह इतर आरोपांखालीही आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपी मनोज करजागी हा काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याचा सहकारी आहे. तसेच तो पक्षकार्यामध्ये सक्रिय आहे. सिद्धारामय्या मुख्यमंत्री असताना तो उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य पहिवहन निगमचा संचालक होता. माजी मुख्यमंत्र्यांसोबत त्याचे काही फोटोही समोर आले आहेत.