भरदिवसा हातातील बॅग हिसकून चोरट्यांनी काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 21:00 IST2018-07-19T21:00:08+5:302018-07-19T21:00:36+5:30
बॅगेतील लाखोंची रक्कम चोरटयांनी केली लंपास

भरदिवसा हातातील बॅग हिसकून चोरट्यांनी काढला पळ
मुंबई - रस्त्याने जात असलेल्या वृद्धाच्या हातातील ४ लाख ४० हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी खेचून अज्ञात चोरट्यांनी पळ काढला होता. हि घटना भरदिवसा मालाड पूर्व स्टेशनजवळ मंगळवारी सायंकाळी घडली. दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून यातील दोन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मालाड पूर्वेकडील दप्तरी रोड, रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा स्टॅण्डजवळून सुकनराज शहा (वय - ६२) हे वृद्ध व्यापारी ४लाख ४० हजार रुपयांची रक्कम असलेली कापडी पिशवी घेऊन जात होते. त्यावेळी दोघा अज्ञात आरोपींनी संगनमत करून शहा यांच्या हातातील पिशवी खेचून पळ काढला. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.