सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:45 IST2025-06-10T12:38:55+5:302025-06-10T12:45:40+5:30

Sonam Raghuvanshi: शिलाँग ट्रिप दरम्यान सोनमने राजाला निर्जन स्थळी नेण्याचा प्लॅन आखला होता. असेही पोलिस तपासात उघड झालययय

How much did Sonam Raghuvanshi make a deal for her husband Raja life How much did she give in advance to whom You will be surprised to know | सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!

सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!

राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची देशभरात जबरदस्त चर्चा होत आहे. या प्रकरणात नव-नवे खुलासेही होताना दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीवर आमिष देऊन राजाची हत्या करवल्याचा आरोप आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना जी माहिती दिली, ती थक्क करणारी आणि अंगावर शहारा आणणारी आहे.

माध्यमांनी पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान आरोपी म्हणाले, ते डोंगर चढून थकले होते आणि त्यांनी राजाला मारण्यास नकार दिला. तेव्हा सोनम त्यांना म्हणाली '20 लाख देईन, पण राजाला मारावे लागेल.' या आमिषानंतर लगेचच सोनमने राजाच्या पर्समधून 15 हजार रुपये काढले आणि त्यांना दिले. जे अॅव्हॉन्स म्हणून होते.

निर्जनस्थळी जाण्याचे प्लॅनिंग- 
शिलाँग ट्रिप दरम्यान सोनमने राजाला निर्जन स्थळी नेण्याचा प्लॅन आखला होता. असेही पोलिस तपासात उघड झाले आहे. आता पैशाचे आमिष आणि अॅडव्हॉन्स पैसे देण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर, हे प्रकरण अधिकच गंभीर होत चालले आहे.

बँक ट्रांझॅक्शन आणि लोकेशनच्या तपासात पोलीस -
मेघालय पोलीस आणि यूपी पोलीस जबाबांच्या आधारे आरोपींचे मोबाइल रिकॉर्ड, बँक ट्रांझॅक्शन आणि लोकेशन डेटाचाही तपास करत आहेत. महत्वाचे म्हणजे, हत्येत इतर लोक सहभागी होते का की संपूर्ण प्रकरण या आरोपींपुरतेच मर्यादित होते, याचा तपासही पोलीस घेत आहेत.

या संपूर्ण गुन्हेगारी प्रकरणात, राज कुशवाह इंदूरमध्ये राहत होता आणि सोनम तथा इतर आरोपींशी त्याचे संबंध होते. एवढेच नाही तर, लोकेशन शेअरिंग आणि कॉल डेटामुळे या सर्वांचे कटाशी संबंधित संबंध स्पष्टपणे समोर आले आहेत.

Web Title: How much did Sonam Raghuvanshi make a deal for her husband Raja life How much did she give in advance to whom You will be surprised to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.