७५ वर्षीय महिलेची घरात घुसून चाकूचा धाक दाखवून लूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 21:23 IST2018-12-04T21:22:12+5:302018-12-04T21:23:31+5:30

यासाठी पोलिसांनी २८ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. आरोपी सतीश किशोर राऊत (वय २८) मैत्रिणीला भेटण्यास आला असताना सहार गाव येथून पोलिसांनी अटक केली.

In the house of 75-year-old woman, robbing a knife in the house | ७५ वर्षीय महिलेची घरात घुसून चाकूचा धाक दाखवून लूट 

७५ वर्षीय महिलेची घरात घुसून चाकूचा धाक दाखवून लूट 

ठळक मुद्देदागिने लुटणाऱ्या सराईत चोराच्या जोगेश्वरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेतयासाठी पोलिसांनी २८ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिलीआरोपी सतीश किशोर राऊत (वय २८) मैत्रिणीला भेटण्यास आला असताना सहार गाव येथून पोलिसांनी अटक केली

मुंबई - जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नटवर नगर येथील एका इमारतीत रेकी करून ७५ वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून तिचे दागिने लुटणाऱ्या सराईत चोराच्या जोगेश्वरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यासाठी पोलिसांनी २८ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. आरोपी सतीश किशोर राऊत (वय २८) मैत्रिणीला भेटण्यास आला असताना सहार गाव येथून पोलिसांनी अटक केली. 

नटवर नगर परिसरातील एका सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला आरोपी सतीशने आम्ही वृद्धांसाठी मेडिकल कॅम्प भरविणार असल्याची खोटी बतावणी करून वृद्ध कुठे कुठे राहतात याची इत्यंभूत माहिती आरोपीने सुरक्षारक्षकाकडून घेतली. नंतर रेकी करून ७५ वर्षीय सुमित्रा दळवी यांना आपण सफाई कामगार असून झाडू देण्यास सांगितले. सुमित्रा या झाडू आणण्यासाठी घरात गेल्यानंतर आरोपी सतीश मागोमाग घर घुसला आणि सुमित्रा यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरचे दागिने घेऊन लंपास झाला. यावेळी सुमित्रा यांचा मुलगा आणि सून नोकरीनिमित्त घराबाहेर असल्याने त्या एकट्या होत्या. याबाबत जोगेश्वरी पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर २ दिवस पाळत ठेवून सतीशला बेड्या ठोकल्या. या आरोपीविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात चोरी आणि जबरी चोरीचे २० गुन्हे दाखल आहेत. आरोपी अंधेरी पूर्व येथील घाटी वाडी परिसरातील मारियाम पटेल चाळीत राहतो. 

Web Title: In the house of 75-year-old woman, robbing a knife in the house