हॉटेलमध्ये वेटरने केली चोरी, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 20:41 IST2019-04-25T20:40:52+5:302019-04-25T20:41:17+5:30
मालकाने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.

हॉटेलमध्ये वेटरने केली चोरी, गुन्हा दाखल
नालासोपारा - विरार पूर्वेकडील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरने स्टाफ रूममधून सहा कामगारांचे मोबाईल आणि रोख रक्कम चोरी करून पळाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. मालकाने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.
विरार पूर्वेकडील मनवेल पाडा येथील रवींद्र बन्सराज चौधरी (38) यांच्या मालकीचे आश्रय हॉटेलमध्ये काम करणारा मूळचा बिहार राज्यात राहणारा वेटर मुकेश कुमार विजया यादव (21) याने मंगळवारी पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान हॉटेलच्या स्टाफरूममधून 6 जणांचे 4 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 39 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पळून गेला आहे.