स्कॉर्पिओवर ट्रक पलटून भीषण अपघात; दोन मुलांसह ८ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 09:45 IST2020-12-02T09:45:35+5:302020-12-02T09:45:54+5:30
Accident news: कारवर ट्रक कोसळत असल्याचे पाहून दोन मुलींनी कारमधून उडी मारली आणि प्राण वाचविले. स्कॉर्पिओमध्ये १० जण बसलेले होते.

स्कॉर्पिओवर ट्रक पलटून भीषण अपघात; दोन मुलांसह ८ ठार
उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये बुधवारी सकाळी मोठा अपघात झाला. लग्न समारंभ आटोपून परतत असलेल्या एका स्कॉर्पिओवर मालवाहतूक करणार ट्रक पलटी झाल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांनी उड्या मारून जीव वाचविला आहे.
घटनास्थळी जिल्ह्याचे अधिकारी पोहोचले असून दोन जण जखमी झाले आहेत. कौशांबीच्या कडाधाम पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला. देवीगंज येथे लग्न समारंभ होता. हा समारंभ आटोपून एका स्कॉर्पिओमधून ६-७ महिला आणि मुले घरी जात होती. ही कार देवीगंज चौकात उभी होती. तेव्हा अचानक एक मालवाहू ट्रक कारवर पलटी झाला. यामध्ये कारमधील ६ महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला.
कारवर ट्रक कोसळत असल्याचे पाहून दोन मुलींनी कारमधून उडी मारली आणि प्राण वाचविले. स्कॉर्पिओमध्ये १० जण बसलेले होते.