शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

हुक्क्याचा धूर अन् तरुण-तरुणी; बहुचर्चित लाहोरीवरच्या रूफ नाईन, गॉडफादरमध्ये छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 8:29 PM

Raid News : मध्यरात्रीनंतर जेवणावळी - गॉडफादरमध्ये आढळला हुक्क्याचा धूर

ठळक मुद्देनिर्धारित वेळ संपूनही रूफ नाईनमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांना खाद्य पदार्थ दिले जात असल्याचे आढळून आले तर गॉडफादरमध्ये चक्क हुक्का पार्लर चालविले जात असल्याचे उघड झाले.दुसरी कारवाई सोमवारी रात्री गिरीपेठमधील गॉडफादर कॅफेमध्ये करण्यात आली. येथे तरुण-तरुणी हुक्क्याच्या धुरात हरविल्याचे चित्र होते.

नागपूर - धरमपेठेतील बहुचर्चित लाहोरी बारच्यावर असलेल्या रूफ नाईन तसेच सीताबर्डीतील गॉडफादर रेस्टॉरेंटमध्ये डीसीपी विनिता साहू यांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री छापा घातला. निर्धारित वेळ संपूनही रूफ नाईनमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांना खाद्य पदार्थ दिले जात असल्याचे आढळून आले तर गॉडफादरमध्ये चक्क हुक्का पार्लर चालविले जात असल्याचे उघड झाले.

धरमपेठेतील लाहोर बार वेगवेगळ्या प्रकारामुळे नेहमीच चर्चेत असतो. वरच्या माळ्यावर बांधण्यात आलेल्या रूफ नाईन रेस्टॉरेंटमध्येही यापूर्वी अनेकदा पोलीस कारवाई झाली आहे. एकदा हे अवैध बांधकाम तोडण्यातही आले होते. मुळ मालक शर्माने हे आता दुसऱ्याला चालवायला दिले असून तेथे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून निर्धारित वेळेपेक्षा जास्त (पहाटेपर्यंत) ग्राहकांना बसवून जेवण ‘खाण-पिणे’ केले जाते, अशी माहिती डीसीपी विनिता साहू यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस पथकाने सोमवारी मध्यरात्री तेथे छापा घातला. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळली. कुणाकडेही मास्क नव्हते आणि ग्राहकांना खाण्यापिन्याचे पदार्थ पुरविले जात असल्याचेही दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी रूफ नाईनचा व्यवस्थापक शुभम प्रफुल्ल जयस्वाल (वय ३०, रा. समता लेआऊट, अंबाझरी), प्रेमकुमार रायभान शेंडे (वय ३६, रा. खडगाव रोड वाडी), सय्यद इफ्तेहार सय्यद मुख्तार (वय३९, रा. नवीन वस्ती टेका) तसेच शारदाप्रसाद चिंतामणी पांडे (वय ४६, रा. गुप्तानगर, सुरेंद्रगड) यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध कोविड नियमावलीचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हुक्क्याचा धूर अन् तरुण-तरुणीदुसरी कारवाई सोमवारी रात्री गिरीपेठमधील गॉडफादर कॅफेमध्ये करण्यात आली. येथे तरुण-तरुणी हुक्क्याच्या धुरात हरविल्याचे चित्र होते. हुक्का प्रतिबंधित असताना देखिल एका ग्राहकाकडून हजार ते दोन हजार रुपये घेऊन तासाभरासाठी हुक्का पॉट दिला जातो. शहरातील मोहक्या ठिकाणी ही सेवा असल्याने तेथे ग्राहकांच्या उड्या पडतात. पोलिसांना आम्ही सांभाळून घेतो, अशी हमी मिळत असल्याने येथे दिवसरात्र तरुण-तरुणींच्या उड्या पडतात. पोलिसांनी सोमवारी रात्री छापा घालताच ग्राहकांसह गॉडफादरच्या मालक-व्यवस्थापकाचीही नशा उतरली. फोटो-व्हिडीओत येऊ नये म्हणून ते तोंड झाकू लागले. पोलिसांनी कोफ्टा कायद्यानुसार तसेच साथरोग कायद्यानुसार मालक, व्यवस्थापक आणि ग्राहक अशा १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कारवाईसाठी दुसऱ्या ठाण्यातील पोलीस

विशेष म्हणजे, सीताबर्डीतील काही पोलीस या दोन्ही ठिकाणी मधूर संबंध ठेवून असल्याने डीसीपी विनिता साहू यांनी आपल्या वाचकासह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातून कर्मचारी बोलवून ही कारवाई करून घेतली.

उपनिरीक्षक कुणाल धुरट, शिपायी पंकज घोटकर (मानकापूर), शत्रूघ्न मुंडे (सीताबर्डी), नितीन बिसेन (धंतोली). विक्रम ठाकूर (सदर) आणि धनंजय फरताडे (सदर) यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :raidधाडnagpurनागपूरPoliceपोलिसArrestअटक