लग्नाचे आमिष दाखवून होमगार्डचा तरुणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 20:50 IST2019-06-22T20:48:50+5:302019-06-22T20:50:18+5:30

लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करून व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. 

Homeguard rape on women by attraction of marriage | लग्नाचे आमिष दाखवून होमगार्डचा तरुणीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून होमगार्डचा तरुणीवर बलात्कार

ठळक मुद्देजीवे मारण्याची धमकी, होमगार्डवर गुन्हा दाखल 

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करून व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील एका होमगार्डवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मागील एक वर्षांपासून मे २०१९ पर्यंत चाकण, एमआयडीसीतील अतिथी लॉज व वाकी येथील श्रावणी लॉज व टोयाटो कार मध्ये घडली, मूळची पश्चिम बंगाल येथील मजुरी करणाऱ्या २३ वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय गजानन खोपडे ( रा. खराबवाडी, चाकण, ता.खेड, जि.पुणे ) याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४५/२०१९, भादंवि कलम ३७६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी कि, मागील एक वर्षांपासून मे २०१९ च्या पहिल्या आठवड्यात चाकण, ता.खेड येथील एमआयडीसीतील अतिथी लॉज, वाकी खुर्द येथील श्रावणी लॉज व सारा सिटी मागे निर्जन स्थळी टोयाटो कार मध्ये अक्षय खोपडे ( रा. खराबवाडी, चाकण ) याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला. तसेच सारा सिटी मागील निर्जन स्थळी अक्षय याच्या टोयाटो कारमध्ये तरुणीने लग्नाबाबत वारंवार विचारणा केली असता अक्षयने पीडित तरुणीला मारहाण करून तू पश्चिम बंगालला निघून जा, व तिकडंच लग्न कर, तू मला इथं दिसली, तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे मॅडम पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: Homeguard rape on women by attraction of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.