वृध्दाच्या डोक्यावर रॉडने मारुन हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 20:24 IST2019-06-05T20:22:55+5:302019-06-05T20:24:22+5:30

पंढरी मदनकर असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

hited rod on the head of the old man and murdered | वृध्दाच्या डोक्यावर रॉडने मारुन हत्या

वृध्दाच्या डोक्यावर रॉडने मारुन हत्या

ठळक मुद्देतक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मदनकर यांचा मुलगा किशोर मदनकर हा शेतावर गेला असता वडील मृतावस्थेत आढळले.

गोंदिया - एका ७० वर्षीय वृध्द व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारुन अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना बुधवारी (दि.५) दुपारी १.३० ते २ वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुुक्यातील सौंदड येथे घडली. पंढरी मदनकर असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार बुधवारी दुपारी मदनकर हे शेतावर गेले होते. दरम्यान अज्ञात व्यक्तीने शेतातच त्यांचा खून केला. मदनकर यांचा मुलगा किशोर मदनकर हा शेतावर गेला असता वडील मृतावस्थेत आढळले. त्यांनी या घटनेची माहिती डुग्गीपार पोलीस स्टेशन दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: hited rod on the head of the old man and murdered