कापड दुकानाची भिंत फोडून धाडसी चोरी; हिंगोली जिल्ह्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:10 IST2018-07-12T14:06:38+5:302018-07-12T14:10:16+5:30

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे एक कापड दुकान मागील बाजूने फोडून धाडसी चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 

In Hingoli district, robbery in dresses shop | कापड दुकानाची भिंत फोडून धाडसी चोरी; हिंगोली जिल्ह्यातील घटना 

कापड दुकानाची भिंत फोडून धाडसी चोरी; हिंगोली जिल्ह्यातील घटना 

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे एक कापड दुकान मागील बाजूने फोडून धाडसी चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, वारंगा फाटा येथे पोलीस मदत केंद्रापासून हाकेच्या अंतरावर मदन श्रीराम वायकोळे यांचे कपड्यांचे दुकान आहे. आज सकाळी वायकोळ यांना दुकानात चोरी झाल्याची माहिती काही परिचितांनी दिली. वायकोळ यांनी तात्काळ दुकानाकडे धाव घेतली. यावेळी चोरट्यांनी दुकानाची मागील भिंत फोडून त्या बाजूचा लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. 

या धाडसी चोरीत चोरट्यांनी गल्ल्यातील रोख १६,७९० रूपये तसेच दुकानातील १,०७,८९१ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.  घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही.एम.केंद्रे, वारंगा फाटा बीटप्रमूख अशोक कांबळे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. 

Web Title: In Hingoli district, robbery in dresses shop