शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

अटक केलेल्या हिंदु युवकांचा पोलिसांकडून छळ, हिंदु विधीज्ञ परिषदेने केला आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 8:10 PM

आरोपींसह तपास अधिकाऱ्यांचीची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या हिंदु युवकांना पोलिसांकडून मारहाण होत असल्याचा गंभीर आरोप हिंदु विधीज्ञ परिषदेने केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत तपास अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात परिषदेचे अधिवक्ता अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी अनेक आरोप केले आहे. तसेच आरोपींसह तपास अधिकाऱ्यांचीची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

पुनाळेकर म्हणाले की, दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या शरद कळसकर याची भेट घेतली असता ही माहिती मिळाली. राजेश बंगेरा आणि अमोल काळे यांना कोल्हापूर तपास पथकातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याने बेलापूर येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयात घुसून अमानुष मारहाण केली. तसेच कॉ. पानसरे प्रकरणातील सहभागाची कबुली न दिल्यास यापेक्षा गंभीर छळाला तोंड द्यावे लागेल, अशी धमकीही दिल्याचे शरद बोलताना कळाले. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सचिन अंदुरे यांची वकिलांनी सोमवारीच भेट घेतली असता शासनाच्या याच अधिकाऱ्याने नंदकुमार नायर यांच्या उपस्थितीत अत्यंत हिंस्रपणे मारहाण केल्याचे अंदुरे यांनी सांगितले. 

आरोपींनी गुन्ह्याची कबुली द्यावी म्हणून  मारहाण करणारे अधिकारी कुटुंबांवर अत्याचार करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोपही पुनाळेकर यांनी केला आहे. तरी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आरोपींसह तपास अधिकाऱ्यांची नार्को चाचणी करण्याची मागणी पुनाळेकर यांनी केली आहे. प्रसंग पडल्यास आरोपींच्या वकीलांचीही नार्को चाचणी करावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेने केली आहे. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान कार्यालय यांच्याकडे पाठवल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभाग