क्रूरतेचा कळस! ९० वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार, हत्या; शरीरावर चावल्याच्या खुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 14:02 IST2020-03-03T13:59:43+5:302020-03-03T14:02:34+5:30

या खळबळजनक घटनेने परिसरात एकाच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Hight of cruelty! 90-year-old raped, murdered; bite marks on the deadbody pda | क्रूरतेचा कळस! ९० वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार, हत्या; शरीरावर चावल्याच्या खुणा

क्रूरतेचा कळस! ९० वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार, हत्या; शरीरावर चावल्याच्या खुणा

ठळक मुद्देतेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात रविवारी त्यांच्या राहत्या घरात ९० वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. शंकर हा एक कुली असून गावात गैरवर्तन केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा नोंद आहे आणि तो फरार आहे

हैदराबाद - देशभरात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात रविवारी त्यांच्या राहत्या घरात ९० वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या खळबळजनक घटनेने परिसरात एकाच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पीडित वृद्धेची मुलीची सून चहा देण्यासाठी गेल्यानंतर हालिया मंडळाच्या अनमुला गावात ती घरी एकटी असताना रविवारी ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने चावल्याच्या आणि अंगावर नखं मारल्या गेलेल्या चाव्याच्या खुणा व जखम आढळून आल्याआहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत वृद्धेच्या मोठ्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
या तक्रारीत २२ वर्षीय सत्रसाल शंकर यांनी गुन्हा केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या कुटुंबाचा आरोप आहे की, आरोपी दारूच्या नशेत मृत वृद्धेच्यानिवासस्थानाजवळ भटकत होता.

"शंकर हा एक कुली असून गावात गैरवर्तन केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा नोंद आहे आणि तो फरार आहे," असे हलियाचे निरीक्षक चंद्रशेखर यांनी सांगितले. पीडित वृद्धेचा मृतदेह नालगोंडाच्या शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.

खळबळजनक! पार्टीला बोलावून अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या

 

जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 

टेरेसवर नेऊन अल्पवयीन मुलाने केला मुलीवर बलात्कार

Read in English

Web Title: Hight of cruelty! 90-year-old raped, murdered; bite marks on the deadbody pda