धक्कादायक! पत्नींची अदला-बदल करणारं घाणेरडं रॅकेट फुटलं, असं सुरू होतं उच्चभ्रूंचं किळसवाणं कृत्य; ग्रुपमध्ये 1000 नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 03:43 PM2022-01-10T15:43:17+5:302022-01-10T15:46:46+5:30

Husband Wife Exchange Racket : आपला पती आपल्याला इतर पुरुषांसोबत शारिरीक संबंध (Sexual Relation) प्रस्तापित करण्यासाठी दबाव टाकत आहे, अशी तक्रार एका महिलेने पोलिसांत दाखल केली. मग....

High profile people Husband-Wife exchange racket 7 people arrested forced sexual relations in kerala | धक्कादायक! पत्नींची अदला-बदल करणारं घाणेरडं रॅकेट फुटलं, असं सुरू होतं उच्चभ्रूंचं किळसवाणं कृत्य; ग्रुपमध्ये 1000 नावं

धक्कादायक! पत्नींची अदला-बदल करणारं घाणेरडं रॅकेट फुटलं, असं सुरू होतं उच्चभ्रूंचं किळसवाणं कृत्य; ग्रुपमध्ये 1000 नावं

googlenewsNext

पत्नींची अदला-बदल करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा केरळमध्ये परदाफाश झाला. यासाठी WhatsApp आणि Messenger वर ग्रुप्स तयार करण्यात आले होते. यात सुमारे एक हजार लोकांचा समावेश होता. Husband Wife Exchange Racket मध्ये सामील असलेल्या 7 जणांना पोलिसांनी कोट्टायम (Kottayam) येथून अटक केली. तर 25 हून अधिक लोकांव पोलिसांचे लक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. (Husband Wife Exchange Racket)

आपला पती आपल्याला इतर पुरुषांसोबत शारिरीक संबंध (Sexual Relation) प्रस्तापित करण्यासाठी दबाव टाकत आहे, अशी तक्रार एका महिलेने पोलिसांत दाखल केली आहे. यानंतर, पोलिसांनी या लोकांना अटक केली. यापूर्वीही  कायमकुलम (Kayamkulam) येथून अशीच घटना समोर आली होती. 

यासंदर्भात बोलताना चांगनचेरीचे डेप्युटी एसपी आर. श्रीकुमार म्हणाले, "हे लोक आधी टेलीग्राम (Telegram) आणि मेसेंजर (Messenger) ग्रुपमध्ये सामील व्हायचे आणि नंतर एकमेकांना भेटायचे. आम्ही तक्रारदार महिलेच्या पतीला अटक केली आहे. यामागे एक मोठे रॅकेट आहे आणि आम्ही इतर आरोपींचा शोध घेत आहोत. 

अटक करण्यात आलेले लोक केरळच्या अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम (Alappuzha, Kottayam, Ernakulam) येथील रहिवासी आहेत. तसेच राज्यातील अनेक उच्चभ्रू लोक या रॅकेटचा भाग असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

असं आहे संपूर्ण प्रकरण -
माध्यमांतील वृत्तानुसार, कोट्टायम येथील एका महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली की, आपला पती आपल्यावर दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास दबाव टाकत आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीसह त्याच्या मित्रांना अटक केली. यानंतर पोलिसांना 'एक्सचेंज रॅकेट'संदर्भात माहिती मिळाली.

सांगण्यात येते, की Kerala Husband Wife Exchange Racket मध्ये एक हजारहून अधिक लोक सामील आहेत. याच्या माध्यमाने शारीरिक संबंधांसाठी मोठ्या प्रमाणावर महिलांची देवाणघेवाण केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण रॅकेट टेलिग्राम आणि इतर ऑनलाइन मेसेंजर अॅप्लिकेशन्सच्या सहाय्याने चालवले जाते. सध्या तपास सुरू आहे.

Web Title: High profile people Husband-Wife exchange racket 7 people arrested forced sexual relations in kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.