नेस वाडिया यांना हायकोर्टाचा दिलासा; प्रीती झिंटाने दाखल केलेला छेडछाडीचा गुन्हा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 20:35 IST2018-10-10T19:34:11+5:302018-10-10T20:35:29+5:30
प्रीती आणि वाडिया हे दोघेही चांगले मित्र होते. मात्र, आयपीएल २०१४ दरम्यान तिकीट वाटपावरून झालेल्या वादाचे पर्यावसान गुन्ह्यात झाले होते.

नेस वाडिया यांना हायकोर्टाचा दिलासा; प्रीती झिंटाने दाखल केलेला छेडछाडीचा गुन्हा रद्द
मुंबई - आयपीएल च्या २०१४ च्या मोसमादरम्यान झालेल्या भांडणानंतर अभिनेत्री प्रीती झिंटाने उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई हायकोर्टात याप्रकरणी नेस वाडियाकडून दाखल करण्यात आलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली असून नेस वाडिया यांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे अभिनेत्री प्रीती झिंटाने उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात दाखल केलेला छेडछाडीचा खटला मुंबई हायकोर्टाने आज रद्द केला आहे. प्रीती आणि वाडिया हे दोघेही चांगले मित्र होते. मात्र, आयपीएल २०१४ दरम्यान तिकीट वाटपावरून झालेल्या वादाचे पर्यावसान गुन्ह्यात झाले होते.
Bombay High Court quashes molestation case against Ness Wadia filed by actor Preity Zinta against him in 2014. pic.twitter.com/pmUOSpWWL3
— ANI (@ANI) October 10, 2018