हायअलर्ट जारी! मुंबईसह महाराष्ट्रावर ड्रोन हल्ल्याचे सावट, डार्क नेटवर दहशतवाद्यांचे झाले संभाषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 19:00 IST2022-01-12T18:59:22+5:302022-01-12T19:00:00+5:30
Possibility of drone attack on Maharashtra : धक्कादायक म्हणजे ड्रोनच्या मदतीतून हा हल्ला होण्याची भीती आहे. याबाबत केंद्रीय तपास यंत्रणेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हायअलर्ट जारी! मुंबईसह महाराष्ट्रावर ड्रोन हल्ल्याचे सावट, डार्क नेटवर दहशतवाद्यांचे झाले संभाषण
जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील कानाचक भागातील संधवन येथे गावकऱ्यांनी संशयास्पद ड्रोनबाबत जम्मू काश्मीर पोलिसांना माहिती दिली आहे. याबाबत पोलिसांचा शोध सुरू आहे. जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्यांची भीती नेहमीच व्यक्त केली जाते. तसेच काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन आला असून मुंबईसहमहाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण झाल्याचं तपास यंत्रणांना कळल्यानं पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनीही ही बाब मान्य केली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोनने हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रजासत्ताक दिनाला आता दोन आठवडे उरले असून राज्यभरात ड्रोन हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे ड्रोनच्या मदतीतून हा हल्ला होण्याची भीती आहे. याबाबत केंद्रीय तपास यंत्रणेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
डार्क नेटवरुन दहशतवाद्यांचं संभाषण झालं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्याची शक्यता केंद्रीय तपास यंत्रणेनं दिली आहे.
Suspected drone spotting reported by villagers in Sandhawan of Kanachak area near International Border in Jammu: A search is going on: J&K Police
— ANI (@ANI) January 12, 2022
महाराष्ट्र सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की, दहशतवादी ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर बोलताना आढळून आले आहेत. सरफेस इंटरनेटच्या तुलनेत डार्क नेट 99% आहे. टोर ब्राउझर डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज पकडता येत नाही. कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो. मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांबाबत अनेकदा अलर्ट सूचना दिल्या जातात.