शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा’’, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करून महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 20:53 IST

Crime News: ''माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा’’, अशी फेसबुकवरून मुख्यमंत्र्यांना विनंती करून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात घडली आहे.

लखनौ - ''माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा’’, अशी फेसबुकवरून मुख्यमंत्र्यांना विनंती करून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात घडली आहे. या महिलेने एका प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती करत एक पोस्ट लिहिली. तसेच काही छायाचित्रेही शेअर केली. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Woman commits suicide after the request to Chief Minister Yogi Adityanath)

रोली गुप्ता उर्फ प्राची मनोज कुमार असे या मृत महिलेचे नाव आहे. तिने लवी गुप्ता या व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्याच्याविरोधातील एफआयआरची कॉपी, लवी त्रिवेदीच्या मारहाणीमुळे रक्तबंबाळ झालेले कपडे शेअर केले आहेत. दरम्यान, ही पोस्ट टाकल्यानंतर तिने रात्री उशिरा घरातील एका खोलीत स्वत:ला कोंडून घेत गळफास घेऊन आत्महत्या केली.

रोली गुप्ताने आपल्या फेसबुक पोस्टमधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली. त्यात तिने सांगितले की, शनिवारी संध्याकाळी लवी त्रिवेदी आणि त्याच्या कुटुंबीयांनी येऊन माझ्यासोबत आणि माझ्या मुलासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मलालाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच नाकाचा चावा घेतला. मारहाण करून माझ्याकडील लॉकेट, कानातील दागिने, माझे दोन अँड्रॉईड फोन आणि ९० हजारांची रोख रक्कम आपल्यासोबत घेऊन गेले. लवी त्रिवेदी आणि त्याच्या वडिलांनी मला खूप मारहाण केली. तसेच त्याच्या आईनेही माझे केस ओरबाडले. माझ्या मुलालाही खूप मारहाण केली. तसेच माझ्याविरोधात काही बोलल्यास संपूर्ण कुटुंबाला गोळ्या घालून ठार मारू, अशी धमकी दिली. यापूर्वी मी त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये खूप वेळा तक्रार केली होती. मात्र त्यावर काहीही कारवाई झालेली नाही, आता माझ्या कुटुंबाला काही झाल्यास त्याची जबाबदारी केवळ सरकारची असेल, सर कृपया माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा  असे तिने या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. दरम्यान, या पोस्टनंतर रोली गुप्ता हिने स्वत:ला तुरुंगात बंद करून घेत गळफास घेतला. 

रोली गुप्ता हिने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांना एक सांगितले तर ते एफआयआरमध्ये दुसरेच काहीतरी लिहिलात, असा आरोप तिने केला होता. दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू आहे. तपासाचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी लवी त्रिवेदी याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस