With help of a boyfriend the wife murdered of husband | लग्नात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा 

लग्नात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा 

पुणे : लग्न करण्याच्या हेतूने प्रियकराच्या मदतीनें तिचा खून करून मृतदेह तीन दिवस घरात ठेवला. रात्रीत विल्हेवाट लावण्याचे नियोजन सुरू असतानाच पोलिसांना खबर मिळाली आणि खुनाला वाचा फुटली. हडपसर भागात ही धक्कादायक घटना शुक्रवारी ( दि. २२) रात्री घडली आहे.
वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव  दिलेल्या माहितीनुसार, आयुज शेख (वय 29, रा. उरुळी देवाची) असे खून झाल्याचे नाव आहे. तर हिना आयुज शेख (26) व तिचा प्रियकर मोहसीन शेख (25) याला अटक करण्यात आली आहे.
दोघेही कोंढवा भागातील आहेत. आयुज आणि हिना यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. काही दिवसांपूर्वी ते उरुळी देवाची येथे राहण्यास आले होते. भाड्याने राहत होते. मोहसीन आणि हीना यांचे प्रेम संबंध होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. त्यामुळे त्यांनी आयुज याला ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी राहत्या घरात आयुज याचा दोघांनी खून केला.
 त्याचा मृतदेह बेडखाली झाकून ठेवला. शुक्रवारी रात्री मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या दोघांनी प्रयत्न सुरू केले. मात्र त्यापूर्वीच वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार रात्रीच पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली.

Web Title: With help of a boyfriend the wife murdered of husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.