मन सुन्न करणारी घटना, ५ मजली इमारतीवरून २ मुलींना फेकले खाली, एकीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 19:25 IST2022-02-04T19:24:33+5:302022-02-04T19:25:08+5:30
Heartbreaking incident : दुसऱ्या मुलीचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मन सुन्न करणारी घटना, ५ मजली इमारतीवरून २ मुलींना फेकले खाली, एकीचा मृत्यू
बिहारमधील पाटणा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हे प्रकरण बहादूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे एका सनकी तरुणाने दोन मुलींना पाच मजली इमारतीवरून खाली फेकले. यामध्ये एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी रुग्णालयात दाखल आहे. दुसऱ्या मुलीचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
स्थानिक नगरसेवक सतीश कुमार यांनी सांगितले की, नंदलाल गुप्ता यांचे कुटुंब रामकृष्ण कॉलनीत राहते. तो फळांचा व्यवसाय करतो. नंदलाल यांना शालू (वय 10 वर्षे) आणि सलोनी (12 वर्षे) या दोन मुली आहेत. गुरुवारी विवेक कुमार नावाच्या व्यक्तीने दोन्ही मुलींना पाच मजली इमारतीवर नेले आणि तेथून त्यांना फेकून दिले. यानंतर एकाचा जागीच मृत्यू झाला. संतप्त जमावाने आरोपीला पकडले. मात्र, दोन्ही मुलींना वरून का फेकून दिले, याचा खुलासा आरोपीने केला नाही.
पोलिसांवर दगडफेक
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी तरुणाला अटक केली. पोलिस आरोपीला घेऊन जात असताना जमावाने पोलिसांवर हल्ला केला. दगडफेकीत पाच पोलिसही जखमी झाले आहेत. वाहनेही जाळण्यात आली. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.
आरोपी काहीही सांगत नाही
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने आतापर्यंत केवळ तो दरभंगा जिल्ह्यातील लहेरियासराय येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे. याशिवाय त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्याने दोन्ही मुलींना पाचव्या मजल्यावरून खाली का फेकले याचा उलगडाही तो करत नाही. याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.