काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 10:20 IST2025-07-10T10:01:05+5:302025-07-10T10:20:17+5:30
UP Crime : पती-पत्नीचं नातं सात जन्मांचं असतं म्हणतात, पण काही लोक हे नातं कलंकित करायला कोणतीही कसर सोडत नाहीत.

AI Generated Image
पती-पत्नीचं नातं सात जन्मांचं असतं म्हणतात, पण काही लोक हे नातं कलंकित करायला कोणतीही कसर सोडत नाहीत. पूर्वी पत्नींवर अत्याचार झाल्याच्या अनेक बातम्या येत होत्या. पण आता पतींवरच अत्याचार होत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. निकिता, मुस्कान आणि सोनम रघुवंशीची प्रकरणं याची उदाहरणं आहेत. कुणी पतीनं पत्नीच्या त्रासाला कंटाळून जीव दिला, तर कुणी प्रियकराच्या मदतीनं पतीला मारून टाकलं. आता उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे पत्नी नर्स होताच, तिनं ११ वर्षांचं नातं तोडून टाकलं. आता पती असा आरोप करत आहे की, पत्नी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे!
लाचार पतीने पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला
संतप्त आणि लाचार पतीने आपल्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो आता पोलिसांकडे संरक्षणाची याचना करत आहे. संत पाल यांनी पोलिसांना सांगितले, "साहेब! मी माझ्या बायकोला शिकवलं, तिला ५ लाख रुपये खर्च करून नर्सिंगचा कोर्स करून घेतला. बायकोला नोकरी लागताच, तिनं मला सोडून दिलं. आता ती तिच्या प्रियकरासोबत 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहत आहे, एवढंच नाही, तर ती मला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे."
नर्सिंगची नोकरी लागताच डोळे फिरले!
हे प्रकरण मझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या संत पाल यांचे लग्न २०१४ मध्ये पम्मी सागर हिच्याशी झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, पम्मी म्हणाली, "अहो! मला शिकायचं आहे." पतीनेही तिचं म्हणणं ऐकलं. त्याने ५ लाख रुपये खर्च करून पम्मीला नर्सिंगचा कोर्स करून दिला. ANMची नोकरी लागल्यानंतर, पत्नीचे तिच्याच विभागातील कर्मचारी मनोजशी प्रेमसंबंध सुरू झाले.
मेहुण्यांनी जीजूला फटकावलं!
संत पालला जेव्हा हे समजले, तेव्हा त्याने पम्मीला समजावले. त्यावेळी पतीला गोंधळात पाडण्यासाठी पम्मीने २०२३ मध्ये प्रियकर मनोजवर गुन्हाही दाखल केला होता. पण ते फक्त एक नाटक होते. ती तेव्हाही मनोजसोबतच संबंधात होती. यामुळे घरात रोज भांडणे होऊ लागली. संत पाल सिंह यांनी पत्नीच्या भावांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, "पम्मीच्या भावांनी २१ जून रोजी मला मारहाण केली. पत्नीनेही स्पष्टपणे सांगितलं, 'हो, आता तू मला आवडत नाहीस!'"
पत्नीपासून जीवाला धोका!
पीडित संत पाल सिंह यांच्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या दोन भावांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी पम्मी अजूनही पतीच्या घरात राहते आहे आणि पती स्वतः जीव वाचवण्यासाठी भाड्याच्या घरात राहत आहे. संत पाल म्हणाले, "माझी पत्नी मला मारून टाकेल. त्यामुळे मला संरक्षण मिळावे अशी माझी इच्छा आहे."