तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 19:43 IST2025-08-28T19:42:27+5:302025-08-28T19:43:12+5:30
प्रेमाच्या नादात रणजीत गुपचूप राजस्थानहून तिला भेटण्यासाठी हरदोईतील तिच्या गावी पोहोचला. पण..

तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका तरुणीने एकतर्फी प्रेमातून एका तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सोशल मीडियावर झाली होती ओळख
राजस्थानमधील रहिवासी असलेला रणजीत आणि हरदोई जिल्ह्यातील मल्लावां पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीची ओळख सोशल मीडियावर झाली होती. रणजीतने दिलेल्या माहितीनुसार, ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. मात्र, तरुणीचे म्हणणे आहे की, रणजीत तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता.
याच प्रेमाच्या नादात रणजीत गुपचूप राजस्थानहून तिला भेटण्यासाठी हरदोईतील तिच्या गावी पोहोचला. मुलीने आरोप केला आहे की, भेटायला आलेल्या रणजीतने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
तरुणीने केला हल्ला
यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी तरुणीने रणजीतवर हल्ला केला आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. या अनपेक्षित आणि भयानक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या रणजीतला तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हरदोईचे अपर पोलीस अधीक्षक नृपेंद्र सिंह यांनी सांगितले की, "पहिल्या दृष्टीक्षेपात हे प्रकरण प्रेमसंबंधांशी संबंधित दिसत आहे. मल्लावां पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल."
पीडित रणजीतने पोलिसांना सांगितले की, "त्याची मैत्री मल्लावां येथील तरुणीसोबत सोशल मीडियावरून झाली होती. तिनेच त्याला घरी भेटायला बोलावले होते. मी तिच्या घरी पोहोचल्यावर तिने माझ्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करून तो कापला." या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.