व्हॅलेंटाईन डेला करायचं होतं नवीन गर्लफ्रेंडशी लग्न, म्हणून जुन्या प्रेयसीचा काटा काढला; मृतदेह फेकायला गेला अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:50 IST2026-02-10T13:49:14+5:302026-02-10T13:50:20+5:30

एका तरुणाने आपल्या नवीन प्रेयसीसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी आपल्या जुन्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली.

He wanted to marry his new girlfriend on Valentine's Day, so he killed his old girlfriend; went to throw away the body and... | व्हॅलेंटाईन डेला करायचं होतं नवीन गर्लफ्रेंडशी लग्न, म्हणून जुन्या प्रेयसीचा काटा काढला; मृतदेह फेकायला गेला अन्..

व्हॅलेंटाईन डेला करायचं होतं नवीन गर्लफ्रेंडशी लग्न, म्हणून जुन्या प्रेयसीचा काटा काढला; मृतदेह फेकायला गेला अन्..

ताजनगरी आग्र्यामध्ये व्हॅलेंटाईन वीकच्या काळात प्रेम, बेवफाई आणि हत्येची एक अशी भयंकर घटना समोर आली आहे, जी ऐकून कोणाचेही काळीज थरथरेल. एका तरुणाने आपल्या नवीन प्रेयसीसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी आपल्या जुन्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, पोटच्या मुलाच्या या गुन्ह्यात त्याच्या आई-वडिलांनीही साथ दिली.

यमुना एक्सप्रेसवेवर सापडला होता मृतदेह

६ फेब्रुवारी रोजी यमुना एक्सप्रेसवेवर खंदौली टोल प्लाझाजवळ एका ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला तरुणीचा मृतदेह सापडला होता. चेहरा रक्ताने माखलेला आणि गळ्यावर जखमांच्या खुणा पाहून पोलिसांना घातपाताचा संशय आला. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण होते, मात्र आग्रा पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणीचा चेहरा साफ केला आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर या मृत तरुणीची ओळख महोबा येथील सोनाली म्हणून पटली.

प्रेमासाठी घर सोडलं, पण नशिबात मृत्यू आला

सोनालीची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी पण अत्यंत दुर्दैवी आहे. ती विवाहित होती, मात्र दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे राहणाऱ्या सनीच्या प्रेमात पडून तिने ४ वर्षांपूर्वी आपले घर आणि पतीचा त्याग केला होता. सनी आपल्याला सुखात ठेवेल या आशेवर ती त्याच्यासोबत राहत होती. मात्र, सनी देहविक्रीच्या काळ्या धंद्याशी संबंधित होता.

हत्येचं कारण:'व्हॅलेंटाईन डे'चं लग्न

काही दिवसांपूर्वी सनीचं सूत दुसऱ्या एका मुलीशी जुळलं. त्याने आपल्या नवीन प्रेयसीला शब्द दिला होता की, १४ फेब्रुवारीला तो तिच्याशी लग्न करेल. मात्र, सोनाली त्यांच्या लग्नात अडथळा ठरत होती. तिला वाटेतून हटवण्यासाठी सनीने आपल्या आई-वडिलांच्या मदतीने तिचा गळा आवळून खून केला.

मृतदेहाची गाडीतून लावली विल्हेवाट

सोनालीचा खून केल्यानंतर सनीने एक गाडी भाड्याने घेतली. मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून तो विल्हेवाट लावण्यासाठी निघाला. मृतदेह नदीत फेकण्याचा त्याचा प्लॅन होता, पण पहाट होत असल्याने पकडले जाण्याच्या भीतीने त्याने तो एक्सप्रेसवेच्या कडेला फेकला आणि पळ काढला.

पोलिसांनी असा फोडला गुन्हा

सनीला वाटले होते की मृतदेहाची ओळख पटणार नाही, पण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत केसचा छडा लावला. पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असताना सनीला अटक करण्यात आली. सुरुवातीला त्याने "सोनालीने फाशी घेतली" असा बनाव रचला, पण पोस्टमार्टम रिपोर्टने त्याचा खोटेपणा उघड केला. आता सनीसह त्याचे वडील प्रदीप आणि आई पोलिसांच्या कोठडीत आहेत.

Web Title : वेलेंटाइन डे पर हत्या: नई प्रेमिका के लिए गर्लफ्रेंड की हत्या, शव फेंका।

Web Summary : आगरा में एक व्यक्ति ने वैलेंटाइन डे पर दूसरी महिला से शादी करने के लिए अपनी प्रेमिका की हत्या कर दी। उसने अपने माता-पिता के साथ मिलकर यमुना एक्सप्रेसवे के पास शव को ठिकाने लगाया। पुलिस जांच में मकसद सामने आया और परिवार गिरफ्तार।

Web Title : Valentine's Day Murder: Girlfriend Killed for New Romance, Body Dumped.

Web Summary : Agra man killed his girlfriend to marry another on Valentine's Day. He, along with his parents, disposed of the body near Yamuna Expressway. Police investigation revealed the grim motive and arrested the family.