क्षुल्लक कारणावरून मारहाण करत पोटावर चाकूने केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 18:05 IST2021-12-27T18:04:21+5:302021-12-27T18:05:19+5:30

Assaulting Case : या रागातून विजय व पंकज यांनी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

He stabbed her in the abdomen for trivial reasons | क्षुल्लक कारणावरून मारहाण करत पोटावर चाकूने केले सपासप वार

क्षुल्लक कारणावरून मारहाण करत पोटावर चाकूने केले सपासप वार

सदानंद नाईक

उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील पंचरत्न इमारतीच्या समोर शनिवारी रात्री साडे बारा वाजता मित्रासोबत बोलत असलेल्या रोहित कांजने यांनी तेथून जात असलेल्या विजय रूपानी व पंकज यांना हटकले. या रागातून विजय व पंकज यांनी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात राहणारे रोहित कांजने हे शनिवारी रात्री साडे बारा वाजता इमारती समोर मित्र धीरज जुमराणी, विशाल चुग व हिरो कलानी यांच्या सॊबत बोलत होते. त्यावेळी मोटरसायकल वरून विजय रूपानी व पंकज जात असताना त्यांना हाय केले. जाताना का हटकले? या रागातून विजय रूपानी व पंकज यांनी रोहित कांजन याला पकडून मारहाण करीत पोटावर चाकूने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहितवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: He stabbed her in the abdomen for trivial reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.