शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

विवाह सोहळ्याला जाणाऱ्या महिलेची सात तोळ्याची सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 2:26 PM

काळ्या रंगाच्या पल्सरवरुन महिलांच्या गळ्यातील सौभाग्यलेणं पंचवटी, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हिसकावून पोबारा करणारा चोरटा पोलिसांच्या हाती लागत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या चोरट्याने मागील अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या नाकीनव आणले आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादरोडवर पुन्हा घटना चोरट्याने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला होता

पंचवटी : औरंगाबादरोडवरील एका लॉन्समध्ये विवाहसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे सात तोळे वजनाची अडीच लाख रुपये किंमतीची सोनसाखळी पल्सरदुचाकीने भरधाव आलेल्या चोरट्यांनी हिसकावून घेत पोबारा केल्याची घटना घडली. आठवडाभरापुर्वीही अशाच पध्दतीने या भागातील एका लॉन्सच्या परिसरात महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली होती. एकुणच सोनसाखळी चोरांच्या टोळीने विवाहसोहळ्यांसाठी येणाऱ्या महिलांवर वक्रदृष्टी केल्याचे बोलले जात आहे.याबाबत अधिक माहिती अशी, आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉन्समध्ये नातेवाईकाच्या लग्नसोहळ्याला आलेल्या वैभवी विश्वनाथ शेळके (३७ रा.गंगापुररोड) या त्यांचे पती व मुलांसमवेत लॉन्समध्ये जात असताना संध्याकाळच्या सुमारास पल्सर दुचाकीने आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेत धूम ठोकली. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात शेळके यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी लूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरट्याने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला होता. शेळके पायी जात असताना संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रस्त्यावरुन त्याने भरधाव दुचाकी त्यांच्याजवळ आणली आणि पोत हिसकावुन सुसाट धूम ठोकली. पाच तोळ्याचे मंगळसुत्र त्यामध्ये एक तोळ्याची सोन्याची साखळी, सोन्याचे गंठण, एक तोळ्याचे त्यामध्ये असलेले मणी असे सुमारे सात तोळ्याचे दागिने घेऊन पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बिनतारी संदेश यंत्रणेवरुन त्वरित परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश देत गस्तीवरील पोलिसांना सतर्क करण्यात आले; मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांना सोनसाखळी चोर हाती लागला नाही. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीPoliceपोलिसChain Snatchingसोनसाखळी चोरी