He pretended to take money back and raped the woman | उसणे पैसे परत घेण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेवर केला बलात्कार
उसणे पैसे परत घेण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेवर केला बलात्कार

ठळक मुद्दे व्हिडीओ क्लिप बनवली असून पतीला दाखवत तुझा संसार उध्वस्त करण्याची धमकी देत अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणीने मंगळवारी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा - मुंबईच्या खार येथे येथे राहणाऱ्या 28 वर्षीय पीडित तरुणीला नालासोपारा येथे उसने दिलेले पैसे घेण्याच्या बहाण्याने बोलावून आरोपी तरूणाने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत अर्नाळा पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई येथील खार परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय पीडित तरुणीला आरोपीने जानेवारी 2019 ते 26 मार्च 2019 च्या दरम्यान उसणे दिलेले पैसे परत घेण्याच्या बहाण्याने नालासोपाऱ्यात बोलावले आणि तिच्या शितपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्या संमतीशिवाय बलात्कार केला आणि त्याची व्हिडीओ क्लिप बनवली असून पतीला दाखवत तुझा संसार उध्वस्त करण्याची धमकी देत अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणीने मंगळवारी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.


Web Title: He pretended to take money back and raped the woman
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.