शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गुरांवरील प्रेमापोटी गमवावा लागला जीव; तरूणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 19:59 IST

Crime News : दोन शेळ्यांचा फडश्या, एकाच दिवशी तीन घटना 

ठळक मुद्देअनिल पांडुरंग सोनुले (३६) या तरूणावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन जागीच ठार केले.

दिलीप मेश्राम

नवरगाव(चंद्रपूर) : सिंदेवाही तालुक्यातील खांडला जवळील खरकाळ नाला परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या अनिल पांडुरंग सोनुले (३६) या तरूणावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन जागीच ठार केले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पिपर्डा बिटातील कक्ष क्रमांक ५६३ मध्ये घडली.         

सर्वञ वाघाचा धुमाकूळ असल्याने खांडला येथील गुरे चारणे गुराख्याने बंद केले. मात्र घरी गुरे असल्याने ते राखण्याचा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला. त्यामुळे खांडला वासीयांनी मिटींग घेऊन आळीपाळीने रोज गावातील तीन माणसे गुरे चारण्यासाठी जातील, असे ठरल्याने अनिल पांडुरंग सोनुले, गजानन कुंभरे आणि विलास कुंभरे असे तीन व्यक्ती रविवारची पाळी असल्याने गुरे चारण्यासाठी गेले होते. खांडला गावापासून तीन किमी अंतरावरील पळसगांव रेंजमधील पिपर्डा बिटात खरकाळ नाला परिसरात तिघेजण तीन भागात गुरे चारत होते. अनिल उन्हामुळे पळसाच्या झाडाखाली बसला असताना अचानक पट्टेदार वाघाने हल्ला केला. त्यानंतर सुमारे ३० मिटरपर्यंत ओढत नेले. ओढत नेत असताना सोबत असलेल्या गजानन कुंभरे यांचे लक्ष जाताच त्यांनी आरडाओरडा करणे सुरू केले. अखेर अनिलला तिथेच सोडून वाघाने धूम ठोकली. या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.          

या घटनेपूर्वी खांडला जंगलातील वाघडोह परिसरात पट्टेदार वाघाने शेळीवर हल्ला करुन जागीच ठार केले. घटना माहिती होताच रत्नापूर बिटाचे वनरक्षक जे. एस. वैद्य व इतर पाच व्यक्ती पंचनाम्यासाठी गेले असता वाघ तिथेच बसून होता. शेवटी खांडला येथील गावकऱ्यांना घटनास्थळी बोलाविल्यानंतर वाघ तिथून निघून गेला. ही घटना दुपारी २ च्या सुमारास घडली.         

आणखी रविवारी खांडला गावापासून दोन किमी अंतरावर सरांडी येथे वाघाने हल्ला करून सदाशीव मोहुर्ले यांची शेळी ठार केली. ही घटना २.३० वाजताच्या सुमारास घडली. तीनही घटनास्थळ जवळपास असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागाने सदर वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी खांडला केली आहे. अनिलच्या मृत्यूपश्च्यात पत्नी, मुलगा व मुलगी असून तो घरातील कमावता व्यक्ती होता.                          महिला वनरक्षकांनी नदी ओलांडून गाठले घटनास्थळघटनास्थळ पिपर्डा बिटात असून येथे येण्यासाठी उमा नदी पडते. शिवाय नदीला साडेतीन ते चार फुट पाणी वाहात आहे. मात्र वाघाने माणसाला मारले असल्याने प्रथम घटनास्थळी पोहचणे हे आपले कर्तव्य समजून पिपर्डा बिटाच्या वनरक्षक सीमा ठाकरे यांनी उमा नदीच्या पाण्यातूनन वाट काढत घटनास्थळ गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaonजळगावDeathमृत्यू