संन्यास घ्यायचाय म्हणत पत्नीला मागितला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 12:20 IST2022-10-25T12:18:54+5:302022-10-25T12:20:12+5:30

या फिर्यादीवरून वरील तिघांसह दत्तात्रय मोरे ( रा. बार्शी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

He asked his wife for a divorce saying that he wanted to take sanyasa | संन्यास घ्यायचाय म्हणत पत्नीला मागितला घटस्फोट

संन्यास घ्यायचाय म्हणत पत्नीला मागितला घटस्फोट

सोलापूर : मला संन्यास घ्यायचा आहे, तू लवकर घटस्फोट दे, असे म्हणत पत्नीला वारंवार मानसिक त्रास देत, क्लिनिक टाकण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणत मारहाण केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत स्मिता सदानंद मोरे (३२, रा. चंदननगर, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्मिता यांचा आरोपी सदानंद मोरे यांच्याशी २०१४ मध्ये विवाह झाला होता, तेव्हापासून आरोपी पती सदानंद हाक्लिनिक टाकायचे आहे. घेतलेल्या घराचे कर्ज फेडण्यासाठी वारंवार वडिलांकडून पैसे आण म्हणून फिर्यादीला त्रास देत होता, तसेच आरोपी सासरे भारत गणपत मोरे (दोघे रा. पुणे) यांनी पैशाच्या कारणावरून टोमणे मारत शिवीगाळ करीत मारहाण केली, तर नणंद स्वाती संजय पाटील हिने सदानंद यास उचकवून मानसिक व शारीरिक त्रास दिला, अशा आशयाची फिर्याद स्मिता मोरे यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील तिघांसह दत्तात्रय मोरे ( रा. बार्शी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: He asked his wife for a divorce saying that he wanted to take sanyasa