हसीना आप्पाचा दरबार भंगला, एक मोठे ब्लॅकमेलर रॅकेटचे धागेदोरे मुंबई, पुण्यापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 07:57 PM2020-06-13T19:57:33+5:302020-06-13T20:04:08+5:30

पीडित आनंदी, लाभार्थ्यांमध्ये भीती : कसून चौकशी झाल्यास अनेकांचे बुरखे फाटतील

Hasina Appa's court broken, threads of a big blackmailer racket reach Mumbai, Pune | हसीना आप्पाचा दरबार भंगला, एक मोठे ब्लॅकमेलर रॅकेटचे धागेदोरे मुंबई, पुण्यापर्यंत

हसीना आप्पाचा दरबार भंगला, एक मोठे ब्लॅकमेलर रॅकेटचे धागेदोरे मुंबई, पुण्यापर्यंत

googlenewsNext
ठळक मुद्देअतिशय थंड डोक्याची मात्र तेवढेच निर्दयी असलेल्या प्रीतीच्या गुन्हेगारीची पद्धत मोठमोठ्या खंडणीबाज गुन्हेगारांनाही लाजवून सोडणारी आहे.पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांसोबत काढलेल्या फोटोंचा अल्बम फेसबुकवर अपलोड असलेली प्रोफाइल ठेवणारी प्रीती बहुतांश सावज फेसबुकवरच हेरत होती.

नरेश डोंगरे


नागपूर : डोक्यावर फसवणुकीचे गुन्हे आणि कटकारस्थान घेऊन उजळ माथ्याने समाजात वावरणारी कुख्यात गुन्हेगार प्रीती ज्योतिर्मय दास उर्फ हसीना आप्पा अखेर आज पोलिसांच्या कोठडीत पोचली. अतिशय थंड डोक्याची मात्र तेवढेच निर्दयी असलेल्या प्रीतीच्या गुन्हेगारीची पद्धत मोठमोठ्या खंडणीबाज गुन्हेगारांनाही लाजवून सोडणारी आहे.

भंडारा आणि नागपुरातील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असूनही प्रीतीने अलीकडे शहर पोलीस दलात ज्या पद्धतीने आपले स्थान निर्माण केले, त्यावरून तिच्या धुर्तपणाचा प्रत्यय यावा. भ्रष्ट ठाणेदारांचे प्रीती शिवाय पानच हलत नव्हते. मोठ्या प्रकरणात त्यांच्यावतीने प्रितीच मांडवली करीत होती. सावज आर्थिकदृष्ट्या किती सधन याचा अंदाज घेऊन प्रीती त्याच्या ब्लॅकमेलिंगचा भाव ठरवत होती. त्याची आर्थिक आणि शारीरिक लुबाडणूक करून पिळून काढल्यानंतर प्रीती त्याला लाथ मारल्यासारखी करीत होती. त्याने धिटाई दाखविल्यास ती सहकारी पोलिसांचा वापर करून पिळून काढलेल्या सावजाची मुस्कटदाबी करीत होती.


प्रीतीची फसवणूकीची पद्धत अतिशय सरळ साधी होती. पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांसोबत काढलेल्या फोटोंचा अल्बम फेसबुकवर अपलोड असलेली प्रोफाइल ठेवणारी प्रीती बहुतांश सावज फेसबुकवरच हेरत होती. प्रारंभी फेसबुक वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ती सावज जाळ्यात ओढायची. सुहास्य वदनाचा प्रीतीचा फोटो पाहून तिची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करणाऱ्याला तिचे मग मेसेज सुरू व्हायचे. ते उशिरा रात्रीपर्यंत चालायचे. प्रीती एकाच वेळी पाच ते सात जणांसोबत सारख्याच मेसेजचा खेळ खेळत होती. ती आपल्या दिलदार मैत्रीचा आणि खुल्या विचाराचा इजहार करीत असल्यामुळे चांगले चांगले प्रितीच्या जाळ्यात ओढले जायचे. नंतर भेटीगाठी आणि सोबत फिरण्याचा सिलसिला सुरू व्हायचा. कालांतराने आपण एकच नाही तर आपल्यासारखे अनेक जण तिच्या अवतीभवती फिरतात, हे पीडित व्यक्तीला कळायचे. त्यातून भांडणाला सुरुवात व्हायची. नंतर प्रीती ब्लॅकमेलिंगवर उतरायची. महिन्याला विशिष्ट रकमेचा हप्ता घेऊन प्रीती शांत बसत होती. तिने अशाप्रकारे नोकरदार, व्यापारी हॉटेल व्यवसायी आणि पोलीस दलातीलही अनेकांना आपले दास करून ठेवले होते.
 


कुठेही भरायचा दरबार

प्रीती भोवती विशिष्ट महिला मैत्रिणी आणि मैत्रिणींचे मित्र यांचा नेहमीच गराडा असायचा. वादग्रस्त जमिनी, बंगले, फ्लॅट याचे सौदे किंवा वादग्रस्त ठरलेला व्यवहार घेऊन ही मंडळी प्रीतीकडे घेऊन यायचे. आपल्या दरबारात बसवून ती दोन्ही पक्षाला बेमालूमपणे गंडवीत होती. प्रसंगी कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज नसतानादेखील प्रीती चार-पाच पोलिसांना बोलवून, त्यांच्याकडून दमदाटी करून व्यवहार आपल्या पदरात पाडून घेत होती. ब्लॅकमेलर महिलांचा प्रीती भोवती नेहमीच घोळका असायचा. या सगळ्या त्यांच्या त्यांच्या सावजाची माहिती देत होत्या आणि प्रीती सावजला दरबारात (सदनिकेत, ओळखीच्या हॉटेलमध्ये) संबंधित व्यक्तीला बोलवून घ्यायची. त्याला तेथे ब्लॅकमेलर महिला गराडा घालायच्या. तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याची तयारी झाली आहे. तुझी काय तयारी आहे, असा प्रस्ताव दिला जायचा आणि त्याच्याकडून मोठी रक्कम उकळली जायची. तिचा हा दरबार वेगवेगळ्या ठिकाणी भरत होता. प्रीतीला तिच्या गराड्यातील महिला-पुरुष हसीना आप्पा म्हणायचे. ही हसीना आप्पा आज अखेर पोलीस कोठडीत पोचली. तिचा दरबार भंगला. त्यामुळे पीडित मंडळी खूश झाली आहे. मात्र, आप्पा आतमध्ये गेल्याने तिच्या लाभार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

हम तो तू भी डूबेंगे सनम...!
अडचणीच्या वेळेस अनेकांनी मदत करण्याचे नाकारल्याने हसीना आप्पा जाम भडकली आहे. शुक्रवारी दुपारपासून तिने अनेकांना वेगवेगळ्या फोनवरुन फोन करून 'हम तो डूबेंगे सनम, तुमको भी लेकर...'अशी धमकी दिल्याची ही चर्चा आहे. पोलिसांनी प्रीतीची कसून चौकशी केल्यास नागपूर विदर्भातील एक मोठे ब्लॅकमेलर रॅकेट ज्याचे धागेदोरे मुंबई, पुण्यापर्यंत आहे, उघड होण्याची शक्यता आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

 

... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन

 

काबुल हादरलं!  नमाजावेळी मशिदीत IED स्फोट, इमामासह चौघांचा मृत्यू 

 

थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका

 

न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

 

ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 



अडचणीच्या वेळेस अनेकांनी मदत करण्याचे नाकारल्याने हसीना आप्पा जाम भडकली आहे. शुक्रवारी दुपारपासून तिने अनेकांना वेगवेगळ्या फोनवरुन फोन करून 'हम तो डूबेंगे सनम, तुमको भी लेकर...'अशी धमकी दिल्याची ही चर्चा आहे. पोलिसांनी प्रीतीची कसून चौकशी केल्यास नागपूर विदर्भातील एक मोठे ब्लॅकमेलर रॅकेट ज्याचे धागेदोरे मुंबई, पुण्यापर्यंत आहे, उघड होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Hasina Appa's court broken, threads of a big blackmailer racket reach Mumbai, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.