न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 04:24 PM2020-06-12T16:24:22+5:302020-06-12T16:26:32+5:30

पीडित महिला ही काम्माम येथेतील राहणारे असून ती नालगोंडा येथील होम केअर संस्थेमध्ये नर्स म्हणून काम करते.

Wardboy blackmailed the nurse by making a nude video call | न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपीने नर्सच्या मैत्रिणींशी फेसबुकवरुन मैत्री करण्यासाठी एक बनावट अकाउंट तयार करुन त्याचा वापर केल्याचा आरोप आहेसुरुवातीला आरोपीने नर्सला व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज केले. परंतु, नर्सने त्याला प्रतिसाद दिला नाही.

हैदराबाद - तेलंगणाच्या वारंगलमध्ये एका व्यक्तीला नालगोंडा पोलिसांनीअटक केली आहे. हा व्यक्ती वॉर्डबॉयचे काम करतो. त्याने फेसबुकवर नर्सचे बनावट फेसबुक खातं उघडून तिचे न्यूड फोटो पाठविण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. आरोपीचे नाव परशा अखिल असं आहे. पीडित महिला ही काम्माम येथेतील राहणारे असून ती नालगोंडा येथील होम केअर संस्थेमध्ये नर्स म्हणून काम करते.

आरोपीने नर्सच्या मैत्रिणींशी फेसबुकवरुन मैत्री करण्यासाठी एक बनावट अकाउंट तयार करुन त्याचा वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नर्सने पोलिसांना एक मेसेज पाठविण्याचा निर्णय घेतला. हा मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने तात्काळ दाखल घेत महिलेशी संपर्क साधला. पीडित नर्सने आरोपीचा मोबाइल नंबर पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल स्ट्रेस करून आरोपीचा शोध घेतला. आरोपी हा वारंगल येथील राहणार असून सिकंदराबाद येथील एका होम केअर संस्थेत वॉर्ड बॉय म्हणून काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी हा वेगवेगळ्या नर्संना सतत भेटायचा आणि त्यांचे फोन नंबर घ्यायचा.

सुरुवातीला आरोपीने नर्सला व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज केले. परंतु, नर्सने त्याला प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्याने व्हॉट्स अ‍ॅपवर व्हिडिओ कॉल देखील केले. यावेळी व्हिडिओ कॉल आरोपीने केला. त्यावेळी नग्न अवस्थेत असल्याचे दिसताच नर्सने कॉल कट केला आहे. हे पाहून नर्सला जबर धक्का बसला. दरम्यान, आरोपीने हा कॉल रेकॉर्ड करून महिलेला पाठविला. आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार अखिलने अशाप्रकारे इतर ३० महिलांना अशाच प्रकारे ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आलं आहे. आणखी अनेक पीडित महिला तक्रार करण्यासाठी पुढे आल्या नसतील असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरूद्ध भा. दं. वि. च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

Web Title: Wardboy blackmailed the nurse by making a nude video call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.