हरियाणातील रोहतकमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कहनी गावात रात्री सपना नावाच्या एका विवाहित महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तिच्या कुटुंबानेच ही हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. घटनेच्या वेळी सपनाचा पती सूरज घरामध्ये नव्हता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सपनाचा दीप साहिलही या भयंकर हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. सपनाला वाचवण्यासाठी साहिल पुढे आला, परंतु हल्लेखोरांनी त्यालाही गोळी मारली. जखमी साहिलला तातडीने पीजीआय ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं, जिथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सपनाने त्याच गावातील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता, ज्यामुळे तिच्या कुटुंबाला तिचा प्रचंड राग आला. या रागामुळेच ही धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच, रोहतक पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Summary : In Rohtak, Haryana, a woman was shot dead by her family due to her love marriage. Her brother was also injured while trying to protect her. Police are investigating.
Web Summary : हरियाणा के रोहतक में प्रेम विवाह के चलते एक महिला की उसके परिवार ने गोली मारकर हत्या कर दी। बचाने की कोशिश में उसका भाई भी घायल हो गया। पुलिस जांच कर रही है।