टेलिव्हिजन मालिकेतून आयडिया मिळाली, मग सुटकेसमध्ये पत्नीचा मृतदेह टाकून लावली विल्हेवाट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 17:10 IST2022-10-20T17:09:13+5:302022-10-20T17:10:44+5:30
गुरुग्राममधील सुटकेस कांडचा अखेर खुलासा झाला आहे. आरोपीला अटक झाली असून त्यानं मृतदेह सूटकेसमध्ये टाकून विल्हेवाट लावण्याच्या टेलिव्हिजन आणि वृत्तपत्रांतील बातम्या वाचल्या होत्या.

टेलिव्हिजन मालिकेतून आयडिया मिळाली, मग सुटकेसमध्ये पत्नीचा मृतदेह टाकून लावली विल्हेवाट!
गुरुग्राम-
गुरुग्राममधील सुटकेस कांडचा अखेर खुलासा झाला आहे. आरोपीला अटक झाली असून त्यानं मृतदेह सूटकेसमध्ये टाकून विल्हेवाट लावण्याच्या टेलिव्हिजन आणि वृत्तपत्रांतील बातम्या वाचल्या होत्या. मग त्याच पद्धतीनं स्वत:च्या पत्नीचा खून करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची आयडियाला त्याला मिळाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.
सोमवारी गुरुग्राममधील अतिशय गर्दीचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणाऱ्या इफको चौकाच्या कडेला एक बेवारस सुटकेस आढळून आली होती. एका ऑटोरिक्षा चालकाची सुटकेसवर नजर पडली. त्यानं तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जेव्हा बॅग उघडली तेव्हा आत एका महिलेचा मृतदेह असल्याचं आढळून आलं. महिलेच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते आणि शरीरावर असंख्य वार केले गेले होते.
टॅटूची विल्हेवाट लावण्याचा आरोपीचा प्रयत्न
पोलिसांनी नमूद केलेली महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपीनं मृत महिलेच्या हातावरील टॅटू मिटवण्यासाठी चाकूनं खूप वार केले होते. तसंच टॅटूचा भाग जाळण्याचाही प्रयत्न केला होता. मृतदेहासोबत कोणताही पुरावा राहणार नाही याची जणू काळजीच आरोपीनं घेतली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.
सीसीटीव्ही फुटेजमधून तपास
ज्या ठिकाणी सूटकेस आढळून आली त्या ठिकाणी असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरांचं फुटेज पोलिसांनी पाहण्यास सुरुवात केली. यात एक व्यक्ती सूटकेस घेऊन याच परिसरात घुटमळत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. दिवसाढवळ्या जड सूटकेस रस्त्यावरुन ओढत ओढत त्यानं चौकात टाकली आणि तिथून तो निघून गेला. पोलिसांनी अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. आरोपीनं आपला गुन्हा कबुक केला आहे.