मुलीने पाहिला आईचा प्रताप, पतीची हत्या करुन बॉयफ्रेंन्डला अडवून झाली बाजूला ८ दिवसांनी खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:05 IST2025-08-05T12:49:45+5:302025-08-05T13:05:23+5:30
हरियाणामध्ये पतीची हत्या करणाऱ्या पत्नीने बॉयफ्रेंन्डला अडकवण्यासाठी कट रचला होता.

मुलीने पाहिला आईचा प्रताप, पतीची हत्या करुन बॉयफ्रेंन्डला अडवून झाली बाजूला ८ दिवसांनी खुलासा
Haryana Crime: हरियाणातील गुरुग्राममधील उद्योग विहार परिसरात, पोलिसांनी अवैध संबंधांमुळे एका हत्या झाल्याच्या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा केला. मृताच्या पत्नीनेच तिच्या प्रियकरासोबत मिळून पती विक्रमची हत्या करण्याची योजना आखली होती. तपासादरम्यान, युट्यूबवर हत्येची पद्धत पाहिल्यानंतर आरोपी पत्नीने कट रचला होता. मात्र महिलेने तिच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने ती स्वतः अडचणीत आली आणि हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणात, पोलिसांनी विक्रमची (मृत) पत्नी सोनी देवी आणि मृतदेह पुरण्यासाठी खड्डा खोदणाऱ्या आरोपींना अटक केली.
हरियाणाच्या गुरुग्राममध्ये पोलिसांनी एका महिलेसह तिच्या पतीची हत्या करून मृतदेह लपवल्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक केली. मुलीला आईचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा अश्लील व्हिडिओ सापडल्यानंतर या प्रकरणाची सुरुवात झाली. मुलीने वडिलांना आईच्या कृत्याबद्दल माहिती दिली. त्यामुळे महिलेने तिच्या पतीला मारण्याचा कट रचला. विक्रम कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच तिने त्याचा खून केला आणि तिच्या प्रियकरावर बलात्कार केल्याचा आणि पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला.
विक्रम मूळचा बिहारचा होता. तो त्याची पत्नी सोनी देवी आणि दोन मुलांसह गुरुग्रामच्या डूंडाहेडा गावात भाड्याच्या घरात राहत होता. एका कंपनीत तो काम करायचा. २६ जुलै रोजी तो नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेला मात्र संध्याकाळी तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या पुतण्याने कंपनीत फोन करुन चौकशी केली. त्यावेळी विक्रम कंपनीतून ९ वाजताच बाहेर पडल्याचे समोर आलं. तीन दिवस काहीच पत्ता न लागल्याने पत्नी सोनीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र कुटुंबियांना सोनीच्या वागण्यावरुन वेगळीच शंका येऊ लागली.
त्यामुळे कुटुंबाने सोनीकडे चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळी सोनीने शेजारी राहणारा विक्रमचा मित्र रविंद्र याच्यावर शंका उपस्थित केली. रविंद्रने माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि त्याचा व्हिडीओ काढल्याचे सोनीने म्हटलं. त्यामुळे पोलिसांनी रविंद्रला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. कसून चौकशी केली तेव्हा रविंद्रने सांगितले की तो भाड्याने गाड्या बुक करतो आणि त्याचे सोनीशी अवैध संबंध होते. पण त्याला भीती होती की त्यांचे हे प्रकरण उघडकीस येईल. विक्रमच्या मुलीने रविंद्रच्या फोनमध्ये त्याच्या आईसोबतचे काही अश्लील व्हिडिओ पाहिले होते आणि तिने हे तिच्या वडिलांना सांगितले होते. यामुळे सोनी आणि रविंद्र यांना त्यांचे सत्य बाहेर येईल म्हणून ते घाबरले होते. समाजात बदनामी होईल आणि घर तुटेल म्हणून दोघांनी विक्रमपासून सुटका करून घेण्याची योजना आखली.
कटामध्ये कोणताही दोष राहू नये म्हणून, दोघांनीही बॉलीवूड चित्रपट दृश्यम आणि क्राईम पेट्रोलचे अनेक भाग वारंवार पाहिले. पोलिसांना संशय येऊ शकेल अशा प्रत्येक चुका त्यांनी टाळल्या होत्या. २६ जुलै रोजी रवींद्रने त्याचे तीन मित्र मनीष, फरियाद आणि आणखी एका मित्रासह विक्रमचे अपहरण केले. त्या चौघांनी दोरीने गळा दाबून खून केला. त्यानंतर, मृतदेह गुरुग्रामच्या मोहम्मदपूर गावातील एव्हिल सोसायटीजवळील एका खड्ड्यात पुरण्यात आला. हा खड्डा रवींद्रचे काका संतरपाल यांनी आधीच खोदून ठेवला होता.
संतरपालला रवींद्रला दत्तक घेतले होते. रवींद्रने त्याला संपूर्ण कट सांगितला आणि खड्डा खोदायला सांगितले. हत्येनंतर रवींद्र आणि त्याचे साथीदार मृतदेह संतरपाल येथे घेऊन गेले आणि खड्ड्यात पुरले. या काळात सोनी सतत रवींद्रच्या संपर्कात होती. ती फोनवर प्रत्येक गोष्टीची माहिती घेत होती. पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी, सोनीने आधी विक्रम बेपत्ता असल्याची तक्रार दिली. नंतर तिने रविंद्रवर बलात्काराचा खोटा आरोप करून प्रकरण आणखी गुंतागुंतीचे करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण कट उघड झाला. सोनीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बलात्काराची कहाणी रचली होती. मात्र रविंद्रने खुलासा केल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला.