Shocking! पुरूष मित्रासोबत हॉटेलमध्ये गेली होती ३६ वर्षीय महिला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 11:37 IST2021-08-21T11:36:36+5:302021-08-21T11:37:22+5:30
मृत महिलेचं नाव इमराना आहे. ती आग्राची राहणारी आहे. सध्या ती भाड्याच्या घरात राजीव नगरमध्ये राहत होती.

Shocking! पुरूष मित्रासोबत हॉटेलमध्ये गेली होती ३६ वर्षीय महिला आणि मग...
हरयाणाच्या गुरूग्राममध्ये एका हॉटेलमध्ये ३६ वर्षीय महिलेच्या हत्येची घटना समोर आली आहे. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. असं सांगितलं जात आहे की, आरोपी तरूणाने महिलेचा धारदार शस्त्राने गळा कापून तिची हत्या केली.
मृत महिलेचं नाव इमराना आहे. ती आग्राची राहणारी आहे. सध्या ती भाड्याच्या घरात राजीव नगरमध्ये राहत होती. मृत महिला तिच्या पुरूष मित्रासोबत हॉटेलच्या रूममध्ये गेली होती. हॉटेलच्या रेकॉर्डमध्ये महिलेसोबत आलेल्या पुरूषाची ओळख अंकित म्हणून पटली आहे. (हे पण वाचा : तरूणीच्या हत्येचा मिळत नव्हता पुरावा, पोलिसांनी असं काही की स्वत:च पोलिसांकडे आला आरोपी!)
ही घटना शहरातील पॉश भागातील ओल्ड डीएलएफच्या एका हॉटेलमध्ये घडली. आरोपीने हॉटेलच्या रूममध्ये आणि लॉबीमध्ये धारदार शस्त्राने महिलेवर अनेकदा वार केला. साधारण ९ वाजून १५ मिनिटांनी आरोपीच्या हल्ल्याचा विरोध करत महिला पहिल्या मजल्यावरून ग्राउंड फ्लोरवर पडली. ज्यानंतर कंट्रोल रूमला महिला पायऱ्यांनी खाली पडल्याची सूचना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील चौकशी सुरू केली. हत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार दिसून आले. आरोपी तरूणावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.