बेपत्ता उद्योगपती हर्षद ठक्करच्या आईचा डीएनएने जुळेना; अद्याप शोध सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 18:24 IST2019-02-14T18:18:50+5:302019-02-14T18:24:42+5:30

अद्याप हर्षद ठक्कर यांचा पत्ता लागला असल्याचं दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  

Harshad Thakkar's mother's DNA not matching; Still searching for | बेपत्ता उद्योगपती हर्षद ठक्करच्या आईचा डीएनएने जुळेना; अद्याप शोध सुरूच 

बेपत्ता उद्योगपती हर्षद ठक्करच्या आईचा डीएनएने जुळेना; अद्याप शोध सुरूच 

ठळक मुद्देशेअर बाजारात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने २ ऑक्टोबरपासून हर्षद ठक्कर घरी गेलेच नाहीत. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी हर्षद यांच्या आईचे डीएनए नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. मात्र डीएनए अहवाल आला असून हर्षद यांच्या डीएनए सापडलेल्या मृतदेहाशी जुळलेला नाही.

मुंबई - आशापुरा इंटिमेन्टस फॅशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हर्षद ठक्कर हे ६ महिन्यांपूर्वी बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप ठक्कर यांचा शोध लागलेला नाही. त्यानंतर ७ ऑक्टोबरला मरिन ड्राईव्ह येथे एक अज्ञात मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी हर्षद यांच्या आईचे डीएनए नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. मात्र डीएनए अहवाल आला असून हर्षद यांच्या डीएनए सापडलेल्या मृतदेहाशी जुळलेला नाही. त्यामुळे अद्याप हर्षद ठक्कर यांचा पत्ता लागला असल्याचं दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  

शेअर बाजारात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने २ ऑक्टोबरपासून हर्षद ठक्कर घरी गेलेच नाहीत. आशापुरा इंटिमेन्टस फॅशन लिमिटेड ही कंपनी देशभरात अंतर्वस्त्रासाठी प्रसिद्ध आहे. ठक्कर कुटुंबीय, नातेवाईक, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि मित्रांकडे चौकशी दादर पोलिसांनी केली होती. 

Web Title: Harshad Thakkar's mother's DNA not matching; Still searching for