शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

वाळू तस्करांशी हातमिळवणी; पोलीस कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 3:45 PM

Jalgaon Police: एस पींचा दणका : डंपर मालकास दंडाची नोटीस

जळगाव : वाळु तस्करांसोबत हातमिळवणी करुन महसूलच्या पथकाने जप्त केलेले अवैध वाळु वाहतूक करणारे डंपर सोडायला लावल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचा कर्मचारी संदीप शालीग्राम पाटील याला शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले. या वृत्तास मुंढे यांनी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  १५ ऑक्टोबर रोजी पहाटे तलाठी रुपेश ठाकूर, अनिरुद्ध खेतमाळस, संदीप धोबाड, सी.एच.किनगे, तहसिलदार यांचे वाहनचालक मनोज कोळी यांनी शहरातील पांडे चौकात अवैध वा वाहतूक करणारे डंपर (क्र.एम.एच १९ सी.वाय ३६०७) अडवले होते. डंपरचालकाने घडलेली घटना मालकास कळिवल्यानतर लागलीच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचा कर्मचारी संदीप पाटील याने  पांडे चौकात जाऊन हे डंपर आपल्या यादीतील आहे, असे सांगून सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पथकाने हे त्याला न जुमानता डंपर पोलीस ठाण्यात आणले, त्यानंतर  पाटील याने पोलीस ठाण्यात ठेवलेली डंपरची चावी काढून घेत चालकास देत निघून जाण्याचे सांगीतले होते. ठाणे अंमलदाराने हा सर्व प्रकार हाणुन पाडला होता.

दरम्यान,हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी संबधित कर्मचारी, पोलिस निरीक्षक अकबर पटेल यांची चौकशी केली. तहसिलदार यांच्याकडून संबधित प्रकारणाचा अहवाल मागवला होता. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संदीप पाटील हा दोषी आढळल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीअंती संदीप पाटील याला निलंबित करण्यात आले आहे. लोकेश महाजन (रा.जळगाव) हा या डंपरचा मालक तर मयुर दिनकर पाटील (रा. साकेगाव) हा डंपरचालक आहे. या डंपर मालकास तलाठींनी २ लाख ३९ हजार ११२ रुपयांचा दंड भरण्याची नोटीस दिली आहे.  

खाकीतील इतर वाळू माफियांचे काय?पोलीस दलात अनेक जण आजही अवैध वाळूचा व्यवसाय करतात. तत्कालीन पोलीस अधीक्षक एस.जयकुमार यांनी या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती, आजही त्यातील एक कर्मचारी पोलीस दलाचे काम कमी आणि वाळूचेच जास्त काम करतो. दुसऱ्याच्या नावावर वाहन घेऊन हे कर्मचारी कोट्याधीश झालेले आहेत. सतत राजकीय लोकांच्या संपकार्त राहून पगार पोलीस दलाचा घेतात अन‌् काम वाळमाफियांचे करतात, अशी स्थिती आहे. पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांच्यासमोर पडद्याआड असलेल्या खाकीतील वाळू माफियांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आव्हान आहे. 

टॅग्स :Policeपोलिस