वाकडमध्ये घरात घुसून शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 17:49 IST2019-04-09T17:46:29+5:302019-04-09T17:49:46+5:30

घराशेजारील मोक्याची जागा आणि त्यावर बांधलेले घर विकत न दिल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराने शेजाऱ्यावर घरात घुसून सत्तूरने सपासप वार करीत जीवघेणा हल्ला चढविला.

half murder attack on person in wakad | वाकडमध्ये घरात घुसून शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला 

वाकडमध्ये घरात घुसून शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला 

ठळक मुद्देशेजारील प्लॉट आणि घर विकत न दिल्याचा राग  

पिंपरी : घराशेजारील मोक्याची जागा आणि त्यावर बांधलेले घर विकत न दिल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराने शेजाऱ्यावर घरात घुसून सत्तूरने सपासप वार करीत जीवघेणा हल्ला चढविला. हा प्रकार सोमवारी (दि ८) रात्री नऊच्या सुमारास मंगल नगर वाकड येथे घडला.
    या हल्ल्यात श्रीकांत महादेव सुर्वे (वय ३५, रा.  मंगल नगर वाकड) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर थेरगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी त्यांच्या पत्नी वासंती श्रीकांत सुर्वे (वय ३३, रा. मंगल नगर वाकड) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार बबलू जोगदंड या सराईत गुन्हेगारासह त्याचा एक साथीदार, त्याची आई व बहीण (नावे समजू शकली नाहीत, सर्वजण रा. मंगल नगर वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत.
 याबाबत माहिती अशी फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी राहायला आहेत. आरोपीच्या शेजारी असलेला एक मोकळा प्लॉट आणि त्यावरील बांधलेल्या घरावर  आरोपीचा घ्यायचे होते. मात्र संबंधित घर पूर्वीच्या मालकाने आरोपीला माहिती होऊ न देता दोन वर्षांपूर्वी सुर्वे कुटुंबियांशी व्यवहार करत प्लॉट विकला याचा राग आरोपीच्या मनात होता .यानंतरही आरोपी जोगदंड याच्या सुर्वे यांना घर व प्लॉट कमी किमतीत देण्यासाठी जीवे मारण्याच्या धमक्या सुरू होत्या. मात्र, फिर्यादी त्याला कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने जोगदंड याला राग होता.
या रागातूनच सोमवारी रात्री नऊच्या सुमारास जोगदंड त्याचे साथीदार व आई, बहीण या सर्वांनी संगनमताने सुर्वे कुटुंबियांवर हल्ला करण्याचे संगनमत केले त्यानुसार आरोपी हातात लोखंडी सत्तुर घेऊन आरोपींनी फियार्दीच्या घरात जबरदस्तीने घुसून जीवघेणा हल्ला चढवित सुर्वे यांच्या  डोक्यावर, पायावर, पाठीवर सततुरने वार करून गंभीर जखमी केले तर फियार्दी यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ करून ते सर्वजण पसार झाले.

Web Title: half murder attack on person in wakad