महिलेचा अर्धवट मृतदेह आढळल्याने कल्याणमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 13:09 IST2019-12-08T13:09:08+5:302019-12-08T13:09:38+5:30
क्रूरपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून फेकल्याचा संशय

महिलेचा अर्धवट मृतदेह आढळल्याने कल्याणमध्ये खळबळ
कल्याण - कल्याणमधील व्होडाफोन गॅलरीजवळ महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिलेची क्रूरुपणे हत्या करून तिचा मृतदेह कल्याणमधील एमएफसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
कल्याणमध्ये एमएफसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे अवशेष प्लॅस्टिकच्या पिशवीत आढळून आले. सदर मृतदेहाचे केवळ अर्धे घड पिशवीत भरून फेकण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित महिलेची क्रूरपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.