शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

मुंडन वाद : मारहाणप्रकरणी शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 21:39 IST

भा. दं. वि. कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२५, ३४२, ५०६, ५०४, ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देशिवसैनिकांनी मारहाण करून त्यांच्या उजव्या कानाचा पडदा फाडून त्यांना दुखापत केली याप्रकरणी आता वडाळा टी. टी. पोलिसांनी शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर आणि प्रकाश हसबे, श्रीकांत यादव यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई - वडाळा परिसरात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याचे शिवसैनिकांनी मुंडन केले होते. हा संतापजनक प्रकार वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी आता वडाळा टी. टी. पोलिसांनीशिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर आणि प्रकाश हसबे, श्रीकांत यादव यांच्यासह इतरांविरोधात भा. दं. वि. कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२५, ३४२, ५०६, ५०४, ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याआधी भा. दं. वि. कलम ३२३, ५००, ५०४, ५०६, ३४ अन्वये तक्रार दाखल करून कारवाई केली होती. मात्र, शिवसेना विरुद्ध भाजप असे राजकीय वातावरण तापले असून भाजपचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी हे मुंडन केलेल्या हिरामणी तिवारी यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यात कारवाई करण्याबाबत येऊन गेले. त्यानंतर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात येऊन याप्रकरणाचा आढावा घेतला आणि शिवसैनिकांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव निर्माण करण्यात आला. तिवारी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना शिवसैनिकांनी मारहाण करून त्यांच्या उजव्या कानाचा पडदा फाडून त्यांना दुखापत केली आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे नमूद केले आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण ?

उद्धव ठाकरेंविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी चोप दिला होता. तसेच भरचौकात त्याचे केस कापून मुंडन करण्यात आलं होतं. दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर 15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध देशभरातील विविध ठिकाणांहून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी (३३) या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. मात्र, त्याला विरोध करताना शिवसैनिकांनी कायदाच हातात घेत तिवारी यांचे मुंडन केले.

ही घटना रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. मुख्यमंत्र्यांची बदनामीकारक पोस्ट फेसबुकवर टाकली म्हणून पोस्ट टाकणाऱ्या हिरामणी तिवारी यांच्या घरी शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर यांनी दोन इसमांनी पाठवून हाताने मारहाण केली आणि शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच मशीनने त्याचे केस कापून मुंडन केले. त्यावेळी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचले आणि दोन इसमांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांचे जबाब नोंद केले असता त्यांनी त्यांच्यात समजोता झाल्याचे सांगून एकमेकांविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तिवारी यांचा जबाब नोंद करून समाधान जुगदर आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३२३, ५००, ५०४, ५०६, ३४ अन्वये वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliceपोलिसFacebookफेसबुकUddhav Thackerayउद्धव ठाकरे