शितपेयातून गुंगीचे औषध देऊन जिम ट्रेनरचा युवतीवर बलात्कार; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 17:27 IST2020-12-21T17:27:03+5:302020-12-21T17:27:41+5:30
माझ्याकडे तुझ्याबरोबरचे व्हिडिओ आहे. या घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास ता व्हिडिओ व्हायरल करेन..

शितपेयातून गुंगीचे औषध देऊन जिम ट्रेनरचा युवतीवर बलात्कार; गुन्हा दाखल
पुणे : भूक लागल्याचे सांगून तरुणीला बोलावून तिला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी जीम ट्रेनर दीपक चौगुले (रा. पिंपरी चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी खराडी येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना खराडी येथील फिटनेस जीममध्ये १७ डिसेंबर रोजी दुपारी घडली. फिटनेस जीममध्ये त्यांची ओळख झाली होती. दीपक याने या तरुणीला फेसबुक कॉल करुन भुक लागली आहे, असे सांगून फिटनेस जीम येथे बोलावले. तिच्या शीतपेयात काहीतरी गुंगीचे औषध टाकले. तिला गुंगी आल्यावर त्याच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने माझ्याकडे तुझ्याबरोबरचे व्हिडिओ आहे. या घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास ता व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली.
त्यानंतर या तरुणीने आपल्या मैत्रिणीशी चर्चा करुन पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक औटे अधिक तपास करीत आहेत.